आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:राहोली पाटी येथे तीन लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे जण ताब्यात

हिंगोलीएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली ते नर्सी नामदेव मार्गावर राहोली पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ता. १३ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका इरटिगा कारची तपासणी केली असता त्यात ३ लाख रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी या गुटख्यासह एकूण १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून वाशिम जिल्हयातील दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील भोकरखेड भागातून एका कारमध्ये (एमएच-३७-व्ही-४७२३) गोवा व राजनिवास गुटख्याची वाहतुक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार विलास सोनवणे, शंकर जाधव, ज्ञानेश्‍वर सावळे, किशोर सावंत, दीपक पाटील, आकाश टापरे, महिला पोलिस कर्मचारी रेश्‍मा शेख, रवीना घुमनर यांच्या पथकाने आज दुपारी साडेबारा वाजल्यापासून वाहनांची तपासणी सुरु केली.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इरटिगा कार थांबवून पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यात गुटख्याचे पोते आढळून आले. पोलिसांनी कार मधील गोपाल आत्माराम रंजवे, विनोग भागवत रंजवे (रा. भोकरखेड, ता. रिसोड, जि. वाशीम) यांची चौकशी केली असता त्यांनी हा गुटखा हिंगोली येथे नेला जात असल्याची कबुली दिली. पोलिसांनी वरील दोघांना ताब्यात घेऊन तीन लाखांचा गुटखा व कार असा १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser