आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य ग्राहक आयोग:लोकअदालतीत 1.32 कोटींची प्रकरणे तडजोडीने निकाली

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय लोकअदालतीत राज्य ग्राहक आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठात ७८ प्रकरणे तडजोडीसाठी दाखल करण्यात आली होती. त्यापैकी १४ प्रकरणात तडजोड होऊन सुमारे एक कोटी ३८ लाख ४१ हजार ५३२ रुपयांच्या प्रकरणांमध्ये तडजोड झाली. ही रक्कम पक्षकारांना मिळणार आहे. लोकअदालतीत अनेक प्रकरणांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेऊन ती निकाली काढण्यात आली. सदस्य सविता बारणे, अॅड. उमा बोरा व स्नेहल कुलकर्णी यांनी पॅनलप्रमुख म्हणून काम पाहिले. यशस्वितेसाठी अॅड. अण्णासाहेब मुळे शेकटेकर, ॲड. के. एम. लोया, अॅड. चैतन्य इंगळे, आर. एस. गंगाखेडकर, वांगीकर आदींनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...