आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्त:चिकलठाणा, मयूर पार्क, नारेगावात 133 नळ तोडले ; शहरातील विविध भागांत कारवाई

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने नियुक्त केलेल्या तीन पथकांपैकी क्रमांक दोनच्या पथकाने दहा दिवसांत शहरातील विविध भागांत कारवाई करत १३३ बेकायदा नळ कनेक्शन तोडले. यात सर्वाधिक बेकायदा नळ नारेगाव, मयूर पार्क, चिकलठाणा परिसरात तोडण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

न्यायालयाच्या निर्देशानुसार मनपाने शहरातील बेकायदा नळ तोडून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी शहरातील नऊ प्रभागांतून प्रत्येकी तीन-तीन पथके नियुक्त केली आहेत. यापैकी क्रमांक दोनच्या पथकाकडे प्रभाग क्रमांक ३, ४ व ५ मधील विविध भागांत १२ ते २३ नोव्हेंबरदरम्यान कारवाई करत तब्बल १३३ बेकायदा नळजोडण्या तोडल्या. नारेगाव-राजेंद्रनगरात ३८, नारेगाव मेन रोडवर १४, सेंट्रल नाका परिसर ११, मयूर पार्क परिसर ४८, कॅनॉट प्लेस मेन रोडवर ६, चिकलठाणा येथील लायन्स क्लब कॉलनीत १८ अशा प्रकारे १३३ नळजोडण्या दहा दिवसांच्या कारवाईत तोडल्या.

बातम्या आणखी आहेत...