आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवाल:4 महिन्यांत 14 आंदोलने, 380 पानांचा अहवाल सादर, काँग्रेसचे शहराध्यक्ष युसूफ शेख यांनी घेतली पटोलेंची भेट

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस शहराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारलेले युसूफ शेख यांनी शनिवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. चार महिन्यांच्या कार्यकाळात नेमके काय केेले याचा तपशील सांगणारा ३८० पानांचा अहवाल सादर केला. त्यावर पटोले यांनी त्यांचे कौतुक करत लोकांच्या प्रश्नांवर लढत राहा असा सल्ला दिला.

या पूर्वीचे शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांची कार्यपद्धती लक्षात घेऊन नवे शहराध्यक्ष युसूफ यांनी दर आठवड्याला आंदोलन असा धडाका लावला आहे. एकुणात १२० दिवसांत त्यांनी १४ आंदोलने केली. त्यात प्रामुख्याने ईडी, संजय राऊत अटक, कोश्यारी, चंद्रकांत पाटील, रमानगर कचरा डेपो आदींचा समावेश आहे. आंदोलनांची तयारी कशी केली, लोक कसे जमवले. प्रसारमाध्यमांमधून प्रतिसाद कसा मिळाला, असा तपशील या अहवालात असून निम्म्यापेक्षा अधिक भाग अर्थातच छायाचित्रांनी व्यापला आहे. पटोले यांची भेट घेतेवेळी माजी मंत्री आरेफ नसीम खान, देवानंद पवार, अतुल लोंढे, अनिस पटेल आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...