आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रभा आयुर्वेद फाउंडेशनतर्फे सोमवारी (२ जानेवारी) मोफत आयुर्वेद चिकित्सा शिबिरात १४० जणांची तपासणी झाली. त्यात ७० रुग्ण संधिवाताचे, तर ३५ रुग्ण पचनाच्या विकाराशी संबंधित आढळले.प्रतापनगर, म्हाडा कॉलनी येथील संकल्प मंगल कार्यालयात आयुर्वेद रथयात्रा व मोफत आयुर्वेद चिकित्सा शिबिर झाले. सकाळी पोलिस निरीक्षक गुरमे यांच्या हस्ते पूजन करून काल्डा कॉर्नर येथून आयुर्वेद रथयात्रा काढण्यात आली. शाळकरी मुलांचे लेझीम पथक सहभागी होते. रथयात्रेत आयुर्वेदावर पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. रथयात्रेत अडीचशेहून अधिक वैद्यांची उपस्थिती होती.ऋषिकेश मदनूरकर, रितेश संकलेचा, सुचेता सावळे, सुनीता परिहार, सतीश बन यांच्यासह ३० वैद्यांच्या टीमने रुग्णांची तपासणी केली. या शिबिराचा समारोप ५ जानेवारीला होणार आहे.
जीवनशैलीत बदल करणे गरजेचे कामाचे असमाधान, अवेळी जेवण, झोप न होणे यामुळे संधिवात, अपचनाचे सर्वाधिक रुग्ण दिसतात, असे वैद्य दत्तात्रेय दगडगावे यांनी सांगितले. योगासने, प्राणायाम, मानसिक स्थैर्य, भूक लागल्यानंतरच जेवण घ्या, तहान लागल्यानंतरच पाणी प्यावे, चहा-कॉफी बंद करा, असा सल्ला देण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.