आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीच्या 1400 रु. वाटणीवरून खून:चोरीनंतर पार्टी करताना दोघांनी तिसऱ्या साथीदाराचा गळा दाबला, 3 दिवसांनी सापडला मृतदेह

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोखंडी पाइप चोरीतून मिळालेल्या १४०० रुपयांचे वाटे करण्यासाठी तीन चोरटे दारू पीत बसले. नशेत वाद झाला व सय्यद आमिर सय्यद सलीम ऊर्फ चिरा, (२१, रा. दादा कॉलनी) व फिरोज शेख युनूस शेख (२६, रा. कैलासनगर) यांनी १६ वर्षीय युसूफ खान असदउल्लखानचा (रा. कैलासनगर) रुमालाने गळा दाबून खून केला.

इकडे युसूफच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत शोध सुरू केला. पोलिस फिरोज, आमिरला घेऊन पार्टी झालेल्या ठिकाणी पोहोचले. तेव्हा मंगळवारी सायंकाळी ५ वाजता जाधववाडीतील झुडपात किड्यांनी भरलेला युसूफचा मृतदेह सापडला. युसूफचे वडील असदउल्लाखान कपडे विकून तीन मुले, एका मुलीच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. युसूफही वडिलांना मदत करायचा. मात्र, काही महिन्यांपूर्वी तो चिरा, फिरोजच्या संपर्कात आला. पाच-सहा दिवसांपूर्वी त्यांनी दादा कॉलनीतून पाइप चोरून १४०० रुपयांमध्ये विकला. त्याचे वाटे करण्यावरून त्यांच्यात शनिवारी वाद झाला.

असदउल्लाखान यांच्या तक्रारीवरून जिन्सीचे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनंता तांगडे यांच्या नेतृत्वातील पथकाने तपास सुरू केला. कैलासनगर परिसरातील फुटेजमध्ये तो आमीर, फिरोजसोबत दिसला. पोलिसांनी मंगळवारी दोघांना ताब्यात घेतले. हेच तीन साथीदार मृत युसूफ खान मारेकरी फिरोज शेख जाधववाडीतील याच जागेवर पोलिसांना मृतदेह आढळला होता.

बातम्या आणखी आहेत...