आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था:वाळूज महानगरात 149 गणेश मंडळ; 225 पोलिसांचा तगडा बंदोबस्त

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूजमहानगरात शुक्रवारी (ता.९) रोजी ‘श्रींच्या’ विसर्जन मिरवणुकीकरिता पोलिस प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंदणीकृत असणाऱ्या १४९ गणेश मंडळासह एक लाखा पेक्षा अधिक घरगुती गणरायाच्या विसर्जनाची १२ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी २२५ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात सन २०१९ मध्ये ११७ गणेश मंडळाची नोंद होती. त्यात वाढ होऊन यंदा तब्बल १४९ गणेश मंडळाची नोंद झाली आहे. दोन वर्षांचा खंड पडल्याने यंदा अधिक उत्साह दिसत आहे. उल्लेखनीयबाब म्हणजे यंदा बहुतांश गणेश मंडळाच्या वतीने ढोल पथक तयार केले आहे. यात तिसगाव येथील रणसंग्राम गणेश मंडळाचे ढोल पथक, शिवनेरी गणेश मंडळाचे ढोल पथक, शिवपुत्र गणेश मंडळाचे ढोल पथक, महिलांचे रणरागिणी ढोल पथक आदींच्या सादरीकरणाची खास उत्सुकता नागरिकांना आहे.

विविध सामाजिक उपक्रम

मागील दहा दिवसापासून विविध गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, नृत्य स्पर्धा, स्वयं संरक्षण प्रशिक्षण, रांगोळी स्पर्धा आदी कार्यक्रम घेतले. त्यासोबत भांडाऱ्याचा कार्यक्रमही बहुतांश सर्वच मंडळांनी घेतला.

अनेक कारखान्यात सुद्धा गणरायाचे आगमन झाले होते. गणराया विसर्जनच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी गणेश मंडळाचे पदाधिकारीे, स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पोलिस पाटील आदींनी पोलिस प्रशासनाच्यावतीने विविध सुचना देण्यात आल्या आहे. यावेळी १ पोलिस उपायुक्त, १ पोलिस निरीक्षक, २ सहायक निरीक्षक, १० उपनिरिक्षक व १४० पोलिस कर्मचाºयांचा बंदोबस्त राहणमार आहे. वाळूज पोलिस ठाणे हद्दीत ४ पोलिस अधिकारी व ७० पोलिस कर्मचाºयांचा बंदोबस्त राहणार आहे.

या ठिकाणी असेल 'विसर्जनाची व्यवस्था'

एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे हद्दीत ९ ठिकाणी श्रींच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात मोरे चौक बजाजनगर येथील सार्वजनिक विहिर, वडगाव पाझर तलाव, जोगेश्वरी पाझर तलाव, सिडको कार्यालयासमोरील सार्वजनिक विहिर, रांजणगावच्या ओमसाईनगरातील सार्वजनिक विहिरी, घाणेगाव पाझर तलाव, तीसगावच्या खवड्या डोंगराची उत्तर बाजु, वडगाव गट नंबरच्या जलकुंभाजवळील खदान व साजापूरचा पाझर तलाव या ९ ठिकाणी ‘श्री’चे विसर्जन केले जाणार आहे. वाळूज पोलिस ठाणे हद्दीत ३ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात लिंबेजळगाव येथील शनी मंदिर, टेंभापुरी मध्यम प्रकल्प व परदेशवाडी तलाव या ३ ठिकाणी श्री विसर्जन केले जाणार आहे. स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने घरातील गणेश मुर्ती एका ठिकाणी संकलीत करुन वाहनाद्वारे विसर्जन स्थळापर्यंत पाठविल्या जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...