आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या सभेला हिरवा कंदील:उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांच्या 15 अटी; राज ठाकरे, फडणवीसांना जे नियम तेच मुख्यमंत्र्यांनाही

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 8 जूनला सभा होणार आहे. या सभेसाठी औरंगाबाद शहर पोलिसांनी आज परवानगी दिली सभेसाठी पोलिसांनी 15 अटी-शर्ती घातल्या आहेत.

आवाज नियंत्रणात ठेवावा लागेल

सभेला पोलिसांनी परवानगी पोलिसांनी दिली असून मुख्य अट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानूसारच सभास्थळी ध्वनीक्षेपकाचा आवाज हवा. यासह 15 अटी सभेसाठी घालण्यात आल्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभे्साठी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जलआक्रोश मोर्चाला जे नियम पोलिसांनी लावले होते तेच नियम मुख्यमंत्र्यांना लावण्यात आले आहेत.

1 मे महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर झालेली जाहीर सभा आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाणी प्रश्नावर काढलेल्या जल आक्रोश मोर्चाला उत्तर म्हणून या सभेकडे पाहिले जात आहे तर दुसरीकडे सभेसाठी शिवसेना नेते, स्थानिक पदाधिकारी श्रमाची पराकाष्ठा करीत आहेत.

राज, फडणवीसांचे नियम मुख्यमंत्र्यांनाही

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी औरंगाबाद पोलिसांच्या ज्या अटी होत्या त्याच अटी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी आहेत. राज ठाकरे यांनी मात्र पोलिसांच्या अटींचे उल्लंघन केले होते आता मुख्यमंत्र्यांच्या सभेत आवाज किती मोठा होतो हे आठ जूनलाच समजेल.

शिवसेनेच्या मराठवाड्यातील वर्धापनदिनी सभा

मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादेत 8 जून 1085 रोजी स्थापन झाली होती. या शाखेचा आठ जूनला 37 वा वर्धापनदिन आहे. हेच निमित्त साधून मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आल्याचे शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे.

या आहेत अटी-शर्ती

  1. आयोजित कार्यक्रमापुर्वी आवश्यक असलेल्या इतर शासकीय विभागाचे आवश्यक ते परवाने प्राप्त करावेत. तसेच उभारण्यात येणाऱ्या व्यासपीठाचे संबधीत ठेकेदारांकडून तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन " स्टेज स्टेबिलीटी " प्रमाणपत्र प्राप्त करावे आणि सर्व परवाने पोलिस ठाणे सिटीचौक येथे कार्यक्रमापुर्वी सादर करावे.
  2. नियोजित जाहीर सभा 4 ते 9.30 या वेळेतच आयोजीत करावी. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करू नये.
  3. कार्यक्रमाचे वेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येवू नये अथवा वाहतुकीस​​​​​​​ अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  4. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येतांना व परत जातांना कोणीही घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.
  5. सभेसाठी बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सुचना द्याव्या. त्या वाहनांनी शहरात व शहरा बाहेर प्रवासा दरम्यान त्या त्या रस्त्यावर विहीत वेगमर्यादेचे पालन करावे. सभेला आलेल्या नागरीकांना त्यांचे वाहने (दोन चाकी, चार चाकी व इतर कोणतेही वाहन ) पाकींगसाठी निर्धारीत केलेल्या ठिकाणीच पाकींग करण्याच्या सुचना द्याव्यात. सभेसाठी येतांना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री महोदय यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आली असून आयोजकांनी त्यांच्या सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरून परत जाण्याच्या वेळी कोणतीही रॅली काढू नये.
  6. कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, इत्यादी बाळगु नये अथवा प्रदर्शन करू नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये.
  7. अट क्रमांक 4, 5, 6 बाबत सभेत सहभागी होणाऱ्या नागरीकांना कळविण्याची जबाबदारी संयोजकांची राहील.
  8. या कार्यक्रमात स्वयंसेवक नेमण्यात यावेत. त्यांची नावे, मोबाईल नंबर तसेच सभेसाठी औरंगाबाद शहराच्या बाहेरून निमंत्रीत करण्यात आलेल्या नागरीकांच्या वाहनांची शहर / गावांना अनुसरून संख्या, त्यांचा येण्याचा व जाण्याचा मार्ग येणान्या लोकांची अंदाजे संख्या ही माहीती सभेच्या एक दिवस अगोदर पोलीस निरीक्षक "सिटीचौक यांचे कडे द्यावी.
  9. सभा स्थानाच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये, अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार धरले जाईल.
  10. सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी निर्देशीत केलेल्या ठिकाणी मजबूत बेरीकेट्स उभारावे. सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरीकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य तो तपासणी करण्याचा अधिकार पोलिसांना​​​​​​​ राहील. यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय होणार नाही याची दक्षता यावी
  11. सभेसाठी वापरण्यात येणान्या निक्षेपकाबाबत मा. सर्वोच्च न्यायालय निर्देशानुसा व ध्वनिप्रदुषण नियंत्रण व नियमानुसार आवाजाची मर्यादा असावा,अटीचा भंग केल्यास पर्यावरण संरक्षण कायदा 1986 च्या कलम 15 अन्वये 5 वर्ष इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची आणि 1 लाखांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते.
  12. सभेसाठी कुठल्याही अत्यावश्यक सुविधा उदा. शहर बस सेवा, अॅम्बुलन्स, दवाखाना, मेडीकल, विजपुरवठा, पाणीपुरवठा, दळव-वळण यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.
  13. सभेसाठी वापरण्यात येणारी विद्युत यंत्रणा, बॅरिकेट्स, मंडप, ध्वनिक्षेपक सुस्थीतीत असल्याची खात्री करावी व विद्युत यंत्रणेमध्ये काही बिघाड झाल्यास पर्यायी विद्युत यंत्रणेची (जनरेटरची ) व्यवस्था अगोदरच करावी,
  14. कार्यक्रमाचे ठिकाणी आपत्कालीन परिस्थीतीत प्रथमोचाराच्या दृष्टीने सुसज्ज अॅम्बुलन्स ठेवण्यात यावी.
  15. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून आयोजकांमार्फत कायदा व सुव्यस्थेस कोणत्याही प्रकारे बाधा येणार नाही याची जबाबदारी संबंधित आयोजकांची राहील. तसेच कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या कायदेशिर आदेशांचे तंतोतंत पालन करावे.
बातम्या आणखी आहेत...