आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा४४ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या वंदे मातरम सभागृहाचे ९ डिसेंबर रोजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता उद्घाटन होत आहे. सभागृह तयार झाल्यावर ८५ दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतीक्षा केल्यानंतर हा लोकार्पण सोहळा होत आहे. दरम्यान, या सभागृहासाठी दीड कोटी रुपयांचा सौरऊर्जा प्रकल्प मंजूर झाला आहे. हा निधी जिल्हा नियोजन समितीतून दिला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.
उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, रोहयो व पालकमंत्री संदिपान भुमरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील, सर्व आमदार तसेच उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर उपस्थित राहतील.
सभागृह कोण चालवणार याचा निर्णय समिती घेणार
यापूर्वी संत तुकाराम आणि संत एकनाथ नाट्यगृहाचे व्यवस्थापन महापालिकेकडे दिल्याने मोठे नुकसान झाले. त्यामुळे वंदे मातरम मनपाकडे देऊ नये, असा रसिकांचा सूर आहे. याविषयी पांडेय म्हणाले की, व्यवस्थापन कोणाकडे असेल याचा निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा निर्णय अद्याप झालेला नाही.
आठ वर्षांपूर्वी भूमिपूजन : हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ किलेअर्क येथेच वंदेमातरम सभागृह बांधावे, या मागणीसाठी शिवसेनेने अनेक आंदोलने केली. ६ नोव्हेंबर २०१४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन पार झाले होते. निधीअभावी काम रखडले होते.
चंद्रकांत पाटील दोन दिवस शहरात
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील ९ डिसेंबरला सकाळी ९ वाजता पैठणला संतपीठात जातील. १२ वाजता वंदे मातरम् सभागृह लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहून ३ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संशोधन संस्थेला भेट देतील.
३.३० विद्यार्थ्यांशी, ४.१५ वाजता उद्योजक, प्राध्यापकांशी यांच्याशी संवाद साधतील. सहा वाजता सभु संस्थेत जाऊन सुभेदारीत मुक्काम. १० रोजी सकाळी ६.३० वाजता प्रल्हाद भवनास भेट देतील. ९.३० वाजता तंत्रशिक्षण संचालनालयाच्या क्रीडा महोत्सवास उपस्थित राहतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.