आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दोन वर्षांपासून पाणचक्कीजवळील मेहमूद दरवाजाची दुरुस्ती आणि क्रांती चौकातील शिवसृष्टीचे काम रखडले आहे. या दोन्ही कामांची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी पाहणी केली. त्या वेळी मेहमूद दरवाजा १५, तर शिवसृष्टीचे ३० दिवसांत काम पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.
मेहमूद दरवाजा १५ दिवसांत वाहतुकीसाठी मोकळा करा. मात्र, जड वाहनांसाठी हा रस्ता बंद ठेवा. जड वाहनांना प्रवेश न देण्यासाठी योग्य त्या अंतरावर बॅरिकेड्स किंवा बार लावा, परंतु या वेळी रुग्णवाहिका सहज जाऊ शकेल यावरही लक्ष ठेवा, अशी सूचना डाॅ. चौधरी यांनी केली. पाणचक्की पुलावर लावलेल्या व्हर्टिकल गार्डनची त्यांनी पाहणी करून भिंतीवर उगवलेली झाडेझुडपे काढून घेण्याचे आदेश दिले. सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश : क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित शिवसृष्टीचे बांधकाम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश डॉ. चौधरी यांनी दिले.
गट्टू बसवणे, फ्लोरिंग, प्रकाश व्यवस्था, टाइल्स अॅम्फिथिएटर आदी कामांचा त्यांनी आढावा घेतला. तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले. या वेळी स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, प्रकल्पाचे कन्सल्टंट अजय ठाकूर, प्रकल्प व्यवस्थापक किरण आढे, इम्रान खान, कनिष्ठ अभियंता नेत्रा जाधव, नंदादीप डिझायनर्सचे कन्सल्टंट महेश वर्मा, प्रकल्प व्यवस्थापक किरण आढे, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, कनिष्ठ अभियंता गोपीचंद चांडक, जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.