आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:परशुराम कुंड रथयात्रेला शहरातून मिळाले 15 लाख ; अरुणाचल प्रदेशातून आलेल्या यात्रेचे जोरदार स्वागत

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरुणाचल प्रदेशातील कांचीपुरम येथे परशुरामाची ५१ फुटांची पंचधातूची मूर्ती उभारण्यात येणार आहे. यासाठी ११ कोटी रुपयांचे निधी संकलन करण्यात येणार आहे. याकरीता ६१ दिवसांत देशातील ४०० शहरांतून भगवान परशुराम कुंड आमंत्रण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी ही यात्रा औरंगाबादेत पोहोचली, तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. औरंगाबाद झोनमधून या उपक्रमासाठी १५ लाख रु. संकलित झाले.

दुपारी साडेतीन वाजता यात्रा एन-९ येथील रेणुकामाता मंदिरात पोहोचली. या वेळी विप्र फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. या मंदिरात आरती केल्यानंतर यात्रा पुढे मार्गस्थ झाली. रथामध्ये परशुरामांची प्लास्टर ऑफ पॅरिसची ४ फुटांची मूर्ती होती. बजरंग चौक मार्गे वाहन रॅॅली क्रांती चौकात आली. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर २० किलो फुलांची उधळण करत अभिवादन करण्यात आले. नंतर औरंगपुरामार्गे रॅली परशुराम स्तंभावर गेली. अदालत रोड येथील इस्कॉन मंदिरात समारोप झाला. पाच देशांच्या सीमेवरील अरुणाचल प्रदेशात भारताचा पहिला सूर्योदयही होतो. भगवान परशुरामांनी या ठिकाणी कार्य केलेले आहे.

त्यामुळे केंद्र सरकारने पंचधातूचा ५१ फुटी पुतळा उभारणीसाठी या जागेची निवड केली आहे. यासाठी ११ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. आतापर्यंत ४ कोटींचा निधी संकलित झाला आहे. केंद्र आणि त्या राज्याने ५०-५० कोटींचा निधी दिला आहे. लोकसहभागातून इतर निधी उभा केला जात आहे. हे स्थळ भविष्यात पाचवे धाम म्हणून विकसित होणार आहे, अशी माहिती स्वामी चिरंजीव रामनारायण दास यांनी दिली.

विप्र संघटनांकडे जबाबदारी यात्रेची जबाबदारी विप्र संघटनांकडे दिली आहे. त्यानुसार यात्रेचे नियोजन केले आहे. अरुणाचल प्रदेश हे सुंदर राज्य आहे. आतापर्यंत भीतीमुळे लोक तिथे जाऊ शकत नव्हते. पण या तीर्थक्षेत्र विकासानंतर लोक तिथे जाऊ शकतील. - सी.एम. शर्मा

बातम्या आणखी आहेत...