आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लाेड तालुक्यातील चारनेरवाडी या अवघ्या ५० उंबऱ्यांच्या गावात १५ जणांनी एमबीबीएस एमडी, एमएस असे उच्च शिक्षण घेऊन नावलाैकिक मिळवला आहे. विशेष म्हणजे डाेंगरदऱ्यात वसलेल्या या छाेट्याशा गावात एसटीसुद्धा जात नाही. पण जिद्दीच्या बळावर येथील विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात गावचे नाव माेठे करत आहेत. चारनेवाडीची लाेकसंख्या अवघी ४०० इतकी आहे. या गावात दळणवळणाची काहीच व्यवस्था नाही. सिल्लाेडपासून ३० किलाेमीटरवर आमठाणा हे बाजारपेठेचे माेठे गाव. तेथून सहा किमी अंतरावर चारनेरवाडी आहे. या गावात प्रामुख्याने राजपूत समाज मोठ्या प्रमाणात आहे. या गावाला परदेशीवाडी या नावानेही संबाेधले जाते. डाॅ. राजू माेहनसिंग गाेठवाल हे गावातील पहिले डाॅक्टर. त्यांनी एमबीबीएस एमडी रेडिऑलिस्टचे शिक्षण घेतले. त्यांच्याप्रमाणेच कल्याणसिंग नथूसिंग राजपूत यांनीही एमबीबीएस एमएसचे शिक्षण पूर्ण करून ते कॅन्सरतज्ज्ञ झाले. त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज व केईएम रुग्णालयात व त्यानंतर गुजरातमधील अहमदाबाद येथील प्रख्यात एचसीजी कॅन्सर सेंटर येथे डीएनबी इन सर्जिकल ऑन्कॉलॉजीचे शिक्षण घेतले. सध्या ते छत्रपती संभाजीनगरमध्ये कमलनयन बजाज रुग्णालयात सेवा देत आहेत.
शिक्षण छत्रपती संभाजीनगरात झाले माझे दहावीपर्यंत शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भुवन विद्यालयात झाले. त्यानंतर बारावीचे शिक्षण घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १९९१ मध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेतले. एमडी रेडिऑलाॅजी झाल्यानंतर जालना जिल्ह्यात मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा दिली. सध्या पनवेल येथे खासगी स्वत:चे रुग्णालय चालवताे. पत्नी संध्या गाेठवालही डाॅक्टर आहे. - डाॅ. राजू माेहनसिंग गाेठवाल, एमबीबीएस, एमडी.
आजाराला घाबरून न जाता हिमतीने प्रसंगाला सामोरे जाण्याचा दिला सल्ला सन्मान पाहून डॉक्टर व्हायचे ठरवले गावात येणाऱ्या डॉक्टरांचा आदर-सन्मान पाहून डॉक्टर व्हायचे ठरवले. माझे मामा कॅन्सरच्या आजाराने मृत्युमुखी पडले. तेव्हाच ठरवले की कॅन्सर स्पेशालिस्ट होऊन कॅन्सर झालेल्यांची सेवा करायची. माझे स्वप्न पूर्णही झाले. कॅन्सर झालेल्यांनी कदापि घाबरण्याची गरज नाही. खचून न जाता हिमतीने पुढे जायला हवे. - डॉ. कल्याण राजपूत, एमबीबीएस, एमएस, कॅन्सरतज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.