आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतर वाहिनी:हर्सूलमधून 15 एमएलडी पाणी वाढणार; क्रॉस नव्हे समांतर वाहिनी

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहागंज, रोजाबागसह जुन्या शहरातील सुमारे १६ वॉर्डांना हर्सूल तलावातून साडेचार एमएलडी पाणीपुरवठा होतो. हा पुरवठा दहा एमएलडीपर्यंत वाढवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजयसिंग यांच्या सल्ल्यानुसार हर्सूल तलावातून जटवाडा रोडने जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ३५० मिमीची स्वतंत्र वाहिनी टाकली आहे. या वाहिनीला जलशुद्धीकरण केंद्र, हर्सूल तलावाजवळ क्रॉस कनेक्शन दिले आहेत. यातून पाच एमएलडी पाणी वाढेल. मात्र, केंद्रेकरांनी क्रॉस कनेक्शनऐवजी थेट समांतर वाहिनी टाकण्याची सूचना केली आहे. त्यामुळे हर्सूल तलावातून १५ एमएलडी पाणी मिळू शकते, असा अंदाज बांधला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...