आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:किराडपुरा दंगलीतील आणखी 15 आरोपींना अटक; 6 एप्रिलपर्यंत कोठडी

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किराडपुरा भागात झालेल्या दंगलीतील आणखी १५ आरोपींना विशेष तपास पथकाने अटक केली. आरोपींना ६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वानखेडे यांनी सोमवारी (३ एप्रिल) दिले.शेख अबरार शेख मेहबूब (३०, रा. रहीमनगर), शेख शफिक शेख शरीफ (३०, रा. बायजीपुरा), तालेब उस्‍मान शहा (२४, रा. कच्चीघाटी), शेख रिझवान शेख सत्तार (२२, रा. किराडपुरा), शहेबाज अजिज पठाण (२२, रा. बाबर कॉलनी), शेख पाशा शेख मेहमूद (३१, रा. गणेश कॉलनी, रशिदपुरा), आसेफ पठाण असदउल्ला पठाण (२५, रा. किराडपुरा), खमरोद्दीन मोमीन शकील मोमीन (२१, अल्तमश कॉलनी), सरफराज खान बाबू खान (२३, रा. हर्सूल), जुनेद शेख जुबेर शेख (२४, रा. कटकट गेट), शेख जमीर शेख शब्बीर (४६, रा. कौसर पार्क, नारेगाव), शेख अकबर शेख पाशा (२९, रा. कैसर कॉलनी), मोहसीन खान युसूफ खान (२९, रा. शरीफ कॉलनी), मोहंमद सोफियान अब्दुल सलाम (३१, रा. शहाबाजार, चाऊस कॉलनी) आणि सय्यद जुबेर सय्यद खालेद (४९, रा. बसैयेनगर, संजयनगर) अशी आरोपींची नावे आहेत.गुन्हा करण्यामागे आरोपींचा नेमका हेतू काय होता याचा तपास बाकी असल्याने आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी केली होती.

अोव्हर येथील वादानंतर अटक केलेल्या सहा आरोपींचा जामीन नामंजूर ओव्हर येथे दोन गटात झालेल्या राड्यातील अटक सहाही आरोपींचा जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. व्‍ही. सपाटे यांनी सोमवारी (३ एप्रिल) नामंजूर केला. गुन्ह्याचा नेमका हेतू काय होता, चिथावणी कोणी दिली, साथीदार कोण आहेत याचा तपास करण्यासाठी सहायक सरकारी वकील योगेश तुपे यांनी त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. आरोपींना ३१ मार्च रोजी पोलिसांनी अटक केली होती. तर न्यायालयाने त्यांना साेमवारपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. आता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.