आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद:कंपनीची भिंत तोडून 15 जणांचा कब्जा ; वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूजच्या एका कंपनीची ३०० फूट लांब व ८ फूट उंचीची संरक्षक भिंत तोडून १५ जणांनी कब्जाचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी रहीमपूर शिवारातील गट क्रमांक ९ मध्ये संकज फोर्जिंग प्रा. लि. कंपनीत घडली. यात मिर्झा बेग व त्याच्या अन्य १५ जणांवर वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल केला. या जमिनीवरून काही दिवसांपासून वाद सुरू आहे. त्यात मिर्झाने कंपनीच्या जमिनीवर दावा करत मंगळवारी जेसीबी व सोबत १० ते १५ जणांना घेऊन गेला. त्यांना वैभव शिवणकर यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता अंगावर जेसीबी घालण्याची धमकी देत कंपनीत दहा फूट आत सिमेंटचे पोल उभे केले. त्यानंतर कंपनी समोरील लिंबेजळगाव ते रहीमपूर रस्ता दोन्ही बाजूने ३ फूट खोदून बंद केला. उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...