आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबाबदारी:15 स्मार्ट पार्किंग स्लाॅट सुरू हाेणार ; महापालिकेचे ठेकेदार कंपनीला निर्देश

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जबाबदारी ट्रायजेन टेक्नाॅलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आली आहे. परंतु, कंपनीने स्मार्ट पार्किंग सुरू करताच काेरोनामुळे लागलीच बंद पडले होते. काेरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर महापालिकेने ठेकेदार कंपनीला पार्किंग स्लॉट सुरू करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, आर्थिक नुकसान झाल्याचे सांगत ठेकेदाराने अनेक मागण्या पालिकेपुढे ठेवल्या. संचालक मंडळाने याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांना दिले होते. त्यानुसार तत्कालीन आयुक्त रमेश पवार आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये पहिली बैठक पार पडली.

यात ठेकेदाराने प्रायोगिक तत्त्वावर १० ठिकाणी पार्किंग स्लॉट सुरू करावेत, त्या स्लॉटला मिळणारा प्रतिसाद पाहून रॉयल्टीत सूट देण्याबाबत सकारात्मक आश्वासन देण्यात आले होते. परंतु, पवार यांची बदली झाली. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या कार्यकाळात करार निश्चितीची बैठक झाली नसल्याने पार्किंग स्लॉट सुरू होऊ शकले नाहीत. मात्र, संबंधित कंपनीने शहरातील प्रमुख मार्गांवर बसवलेले डिजिटल बोर्ड शोभेपुरतेच उरले असून, काही ठिकाणी पार्किंगचे फलकही गायब झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता मंगळवारी आयुक्तांच्या दालनात हाेणाऱ्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

स्मार्ट पार्किंगवर फैसला हाेण्याची शक्यता : या प्रकल्पात कंपनीने सुमारे १८ कोटींची गुंतवणूक केली असून काेराेनामुळे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगत, ठेकेदाराने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या १७ लाखांच्या रॉयल्टीत सूट देण्याची मागणी केली आहे. दुचाकीसाठी प्रति तास ५ ऐवजी १५, तर चारचाकीसाठी प्रति तास १० ऐवजी ३० रुपये शुल्कवाढीसह तीन वर्षांची मुदतवाढ मागितली आहे. त्यामुळे आयुक्तांच्या बैठकीत कंपनीच्या काेणत्या मागण्या मान्य हाेतात, त्यावरच स्मार्ट पार्किंगचे भवितव्य अवलंबून असून या बैठकीतच त्याचा फैसला हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...