आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

क्राइम:वसमत तालुक्यात 15 वर्षीय मुलाचा गळा दाबून खून, शेतातील विहिरीत फेकला मृतदेह

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील फाटा येथील पंधरा वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह विहिरीत टाकल्याचे उत्तरीय तपासणी मध्ये स्पष्ट झाले आहे. यावरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी (17 जुलै) रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील फाटा येथील बालाजी शिवाजी काकडे (15) त्याच्या भावासोबत गुरुवारी (16 जुलै)  शेतामध्ये गेला होता. दोघेही शेतात काम करत असताना त्याचा भाऊ काही जनावरे आणण्यासाठी गावात आला. त्यानंतर तो शेतात गेल्यानंतर बालाजी तेथे  दिसलाच नाही. त्याने हा प्रकार घरी सांगितला. त्यानंतर बालाजीचा शोध सुरू झाला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत तो सापडला नाही.

याबाबतची माहिती वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याला मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, जमादार भुजंग कोकरे, बालाजी मिरासे यांच्या पथकाने परिसरात पाहणी केली. त्यानंतर शुक्रवारी (17 जुलै) बालाजीचा मृत्यदेह शेतातील विहिरीमध्ये आढळून आला. पोलिसांनी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. उत्तरीय तपासणीमध्ये बालाजी याचा गळा दाबून खून केला व त्यानंतर मृत्य विहिरीच्या पाण्यात टाकल्याचे स्पष्ट झाले.  

याप्रकरणी शिवाजी काकडे यांच्या तक्रारीवरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपाधीक्षक सतीश देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलिसांनी आता मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांचे जबाबही घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.