आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकप्रतिनिधी:पर्युषण पर्व पूजेत सहभागी झालेल्या 15 वर्षांखालील 150 मुलांचा सत्कार

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्युषण महापर्वाच्या पाचव्या दिवशी सिडको येथील स्थानकवासी मंदिरात पूजेला बसलेल्या १५ वर्षांखालील १५० मुला-मुलींचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी गायक मेहुल रूपडा यांच्या स्वरांनी रंगलेल्या भजनसंध्येत शहरातील विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी सहभागी झाले. उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणात सोहळा रंगला.

भगवान महावीर जन्मवांचननिमित्त श्रावक संघ सिडकोतर्फे सकल जैन रविवारी सायंकाळी भजनसंध्येचे आयोजन केले होते. या वेळी मेहुल यांनी ‘ध्वज जैनो का लहेराएँगा हर एक मोड पर’, ‘प्रभुजीचे रूप किती छान दिसत’, ‘मंदिर बडा सुहाना दर्शन को आप आना’ अशा एकाहून एक सुंदर गीतांनी वातावरणात रंगत भरली. माता त्रिशलांना आलेले चौदा स्वप्न, भगवंतांचा पाळणा यांची विशेष सजावट करण्यात आली होती. या वेळी केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रशांत बंब, भाजप जिल्हाध्यक्ष संजय केणेकर, माजी नगरसेवक प्रमोद राठोड, मनीषा भन्साली, राजेंद्र दर्डा, सुभाष झांबड उपस्थित होते. मंदिरात कुमारपाल महाराजांच्या हस्ते महाआरती झाली.

बातम्या आणखी आहेत...