आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काळाचा घाला:150 पोळ्या आणि एक डब्बा चटनी घेऊन निघाले होते 20 मजुर, 16 जणांसाठी बनला शेवटचा प्रवास; डोळे उघडल्यावर दिसले साथीदरांचे मृतदेह

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: सुमित डोळे/सतीश वैराळकर
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र सरकारने मृतांच्या कुटुंबांना 5-5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली

45 दिवसांपूर्वी लॉकडाउन झाल्यामुळे जालन्यात सर्वकाही बंद झाले. रोज कमवून खाणाऱ्या मजुरांसाठी खाण्या-पिण्याची गैरसोय झाली. याठिकाणी बहुतेक मजुर हे यूपी, बिहार आणि मध्य प्रदेशचे होते. या सर्वांकडे नावाला पैसे होते. कसेबसे महिनाभर त्यांनी संसाराचा गाडा ओढला. पण, नंतर सामाजिक संघटना आणि सरकारच्या भरोशावरच होते. पण, मिळणारी ही मदत दोन किंवा तीन दिवसातून एकदाच मिळायची. यादरम्यान त्यांना माहिती मिळाली की, परप्रांतातील मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी विशेष ट्रेन्स सुरू करण्यात आल्या आहेत. यातच औरंगाबाद किंवा भुसावळवरुनही एक ट्रेन जाणार असल्याची माहिती समोर आली होती.

औरंगाबादकडे जाण्यासाठी मध्य प्रदेशातील हे 20 मजुर रेल्वे ट्रॅकने चालत जालन्यावरुन औरंगाबादकडे निघाले. त्यांच्याकडे काही होते, तर फक्त 150 पोळ्या आणि एक डब्बा टिफीन. पण, त्यांना माहिती नव्हते की, हा प्रवास या 20 मजुरांपैकी 16 मजुरांसाठी शेवटचा ठरणार आहे.

प्रवासात 150 पोळ्या आणि एक डब्बा चटनी

मजुरांनी विचार केला की, लवकरच आपण घरी जाणार आहोत. त्यांनी गुरुवारी संध्याकाळी 150 पोळ्या बनवल्या आणि एक डब्बा भरुन चटनी घेतली. काही वेळेनंतर सर्वजण भुसावळसाठी निघाले. या सर्वांचे वय 21 ते 45 दरम्यान होते. काही मजुर शहडोलचे होते, तर काही कटनीचे. सर्वजण चालत औरंगाबाद जिल्ह्यातील करमाडजवळ पोहचेपर्यंत रात्र झाली होती. त्यामुळे त्यांनी काही वेळ झोप घेण्याचा विचार केला.

...नंतर काही जणांनी डोळे उघडलेच नाही

सज्जन सिंह याच मजुरांसोबत होते. या अपघातात त्यांचा जीव वाचला. ते म्हणाले की, “भूक लागल्यामुळे ट्रॅकवर बसुनच जेवण करू लागलोत. जेवण झाल्यावर काही वेळ आराम करण्याचा विचार केला. ट्रॅकवर डोके ठेवून आम्ही झोपलोत. झोप झाल्यावर डोळे उघडले आणि समोर भयंकर दृष्ट होते. माझ्याजवळ इंटरलाल झोपला होता, त्याने मला ओढल्यामुळे मी वाचलो. पण, माझे साथीदार वाचू शकले नाही.” 

यामुळे झाली चुकी

सज्जन म्हणाले की, “डोळे उघडल्यावर दिसले की, माझी बॅग ट्रेनमध्ये अडकली आहे. मी विचार केला की, ट्रेनतर बंद आहेत, मग ही ट्रेन कुठून आली. नंतर दिसले की, ही मालगाडी आहे, पण ट्रेन निघून गेल्यावर सर्वकाही संपले होते. माझ्या 16 साथीदारांचे मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत पडले होते.” 

लोकांकडून मागितली मदत

“सुरुवातील वाटले की, एक वाईट स्वप्न आहे. काही क्षणातच हे सत्य असल्याचे कळाले. 20 पैकी आम्ही चार जिवंत वाचलो. हे दृष्य पाहून खूप भीती वाटली, पण नंतर आम्ही जवळच्या घराकडे धावत जाऊन मदत मागितली. त्यांनी आम्हाला पाणी पाजले आणि पोलिसांना माहिती दिली.” 

बातम्या आणखी आहेत...