आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टी:मराठवाड्यात 20 लाख हेक्टरवरील पिकांचे 1500 कोटी रुपयांचे नुकसान; अंतिम नुकसान दोन हजार कोटींवर जाण्याचा ‘महसूल’चा अंदाज

प्रवीण ब्रह्मपूरकर | औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या वर्षी साधारण 3350 कोटी रुपयांची मराठवाड्यात मदत मिळाली होती

मराठवाड्यात या वर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे १५ ऑक्टोबरपर्यंत तब्बल २० लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे १४५६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे काम अजूनही सुरूच आहे. त्यामुळे नुकसानीचे क्षेत्र आणि नुकसान भरपाईसाठी लागणाऱ्या निधीमध्येही आणखी वाढ होणार आहे. नुकसानीचा आकडा दोन हजार कोटींपेक्षा आधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोयाबीन कापणीला आले असतानाच सततच्या पावसाने सोयाबीनला कोंब फुटले. मूग, उडीद झ ही पिकेही हातून गेली. कपाशीची बाेंडे सडल्याने उत्पन्न घटणार आहे. फुटलेला कापूस भिजत असल्याने त्याची प्रत खराब झाली आहे.

कोरडवाहू १९ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान

मराठवाड्यात पावसाचा कोरडवाहू क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. १९ लाख ९१ हजार ४३२ हेक्टरवर नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई देताना हेक्टरी ६८०० रुपये प्रमाणे साधारण १३५४ कोटी रुपये कोरडवाहू क्षेत्रासाठी लागणार आहेत. तर बागायती ३२१२४ हेक्टरचे नुकसान झाले असून १३५०० हेक्टरप्रमाणे ४३ कोटी ३६ लाख तर फळपिकांचे ३२५६८ हेक्टर नुकसान झाले असून हेक्टरी १८ हजार रुपयाप्रमाणे ५८ कोटी ६२ लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे २० लाख ५६ हजार १२५ हेक्टरसाठी १४५६ कोटींची नुकसान भरपाई द्यावी लागेल.

पावसामुळे अडचण

मरावाड्यात पंचनाम्याला पावसामुळे अडचण येत आहे. सतत पाऊस पडल्यामुळे तसेच अनेक ठिकाणी चिखल झाला आहे. त्यामुळे पंचनाम्याचा अंतिम अहवाल येण्यास आणखी उशीर लागणार आहे.

गतवर्षी ३३५० कोटींची मदत

नुकसानीचे पंचनामे सुरूच असून या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी साधारण ३३५० कोटी रुपयांची मदत मराठवाड्यात देण्यात आली होती. या वर्षी नुकसान अधिक आहे. त्यामुळे नुकसान भरपाई द्यावयाच्या आकड्यांतही आणखी वाढ होणार असून हा आकडा दोन हजार कोटींवर जाण्याची शक्यता महसूल विभागाच्या अहवालात वर्तवली आहे.

बातम्या आणखी आहेत...