आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:1500 व्यावसायिक नळांना मीटर; 1000 लिटरसाठी 143 रुपये

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाणी वाचवण्यासाठी १५०० व्यावसायिक नळांना मीटर बसवण्याचा निर्णय मनपाचे प्रभारी प्रशासक सुनील चव्हाण यांनी घेतला आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. मीटर बसवल्यावर एक हजार लिटरला १४३ रुपये द्यावे लागणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून मनपा पाणीपुरवठा विभागातील उपअभियंत्यांनी प्रत्येक प्रभागामधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यात २० जणांनी मीटरची मागणी केली आहे. घरगुती वापराच्या नळ जोडणीला मीटर बसवले तर एक ते हजार लिटरला २९ रुपये, १७ हजार लिटरपर्यंत ४८ तर २३ हजार लिटरपर्यंत ७३ आणि त्या पेक्षा जास्तसाठी ९५ रुपये असा दर आहे.

व्यावसायिक नळाची पाणीपट्टी अशी : अर्धा इंच - २०,१५०, पाऊण इंच - ३९,८००, एक इंच - ७४,५००, दीड इंच - ३,२६,१५०, दोन इंच - ५,४३,५५०, तीन इंच - ८,६९,७००, चार इंच - १३,०४,५५०, सहा इंच - २१, ७४,२००, आठ इंच - ३२, ६१, ३०० रुपये.

बातम्या आणखी आहेत...