आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास:मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मित्रांंसोबत पोहण्यासाठी गेलेल्या ऋषिकेश निवृृत्ती निकम या १६ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. तो चार मित्रांसह सातारा परिसरातील एका खासगी विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. ही घटना ९ एप्रिल रोजी दुपारी समोर आली. शालेय शिक्षण घेणारा ऋषिकेश आई-वडिलांसोबत पुंडलिकनगरमध्ये राहत होता. काही दिवसांपूर्वी तो मित्रांसह सातारा परिसरातील गट क्रमांक २३२ मधील एका खासगी विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. रविवारीही तो मित्रांसोबत पोहायला गेला. दुपारी तीनच्या सुमारास ऋषिकेश बुडायला लागला. मित्रांच्या हा प्रकार लक्षात येईपर्यंत तो खोलवर बुडाला. मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी सातारा पोलिसांना माहिती दिली.

उपनिरीक्षक संभाजी गोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागाच्या मदतीने ऋषिकेशला बाहेर काढून घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला हाेता. ऋषिकेशचे वडील खासगी कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्याच्या मामाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेशला फिटचा त्रास होता. विहिरीत उतरल्यानंतर फिट आल्यानेच तो बुडाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. सातारा पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.