आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादारु पित असताना पैशांच्या वाट्यावरुन झालेल्या वादातून दोन मित्रांनी सोळा वर्षाचा युसूफ खान असद उल्लखान या मित्राचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तीन दिवस निवांत फिरत राहिले. इकडे पोलिस सोळा वर्षाच्या मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत शोध सुरू केला. युसूफ शेवटचा दिसलेल्या दोन मित्रांना ताब्यात घेतले आणि चौथ्या दिवशी युसूफचा अक्षरक्ष: कुजलेल्या, किड्यांनी घेरा घातलेला मृतदेहच समोर आढळून आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता जाधववाडीत समोर आली. सय्यद आमीर सय्यद सलीम उर्फ चिरा, आणि फिरोज शेख युनूस शेख, असे आरोपींचे नावे आहेत.
काय आहे प्रकरण?
कैलासनगरमध्ये राहणारा युसूफ वडिलांच्या कपडे विकण्याच्या व्यवसायात मदत करत होता. परिसरात राहणाऱ्या सय्यद अमीर व फिरोज सोबत त्याची मैत्री होती. वडिलांना व्यवसायात मदत करणारा युसूफ शनिवारी सकाळी अकरा वाजता घराबाहेर पडला. परंतू त्यानंतर तो घरी परतलाच नाही. नातेवाईक, मित्र सर्वत्र त्याचा शोध घेऊनही युसूफ मिळून न आल्याने त्याच्या वडिलांनी जिन्सी पोलिसांकडे तक्रार केली. अल्पवयीन असल्याने युसूफ च्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिन्सीचे उपनिरीक्षक अनंता तांगडे यांच्या पथकाने त्याचा शोध सुरू केला. तांत्रिक तपासासह युसफचे मित्र, नातेवाकांकडे विचारपूस करत असताना तो शनिवारी शेवटचा आमीर व फिरोज सोबत दिसल्याचे समोर आले. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेज मध्ये तै कैद झाले. दोघांचा शोध घेत चौकशी सुरू केली. सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या आमीरने मात्र नंतर युसूफचा जाधववाडी परिसरात गळा आवळून खून करुन बॉडी निर्मनुष्य परिसरात फेकून दिल्याची कबुली दिली. उपायुक्त दिपक गिऱ्हे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, निरीक्षक संभाजी पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, युसूफ चा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. परिसरात मोठी दुर्गंधी सुटल्याने सर्वांना मास्क परिधान करावे लागले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.