आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरणाकडे नागरिकांची पाठ:मनपाकडील कोरोनाचे 16 हजार डोस 31 डिसेंबरला होणार बाद

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या विविध केंद्रांवर गेल्या तीन महिन्यात केवळ ५४३ जणांनीच काेराेना प्रतिबंधक लस घेतली. त्यामुळे लसींचा साठा तसाच पडून आहे. सध्या कोव्हॅक्सिनचे १६ हजार डाेस शिल्लक असून त्याची एक्स्पायरी येत्या ३१ डिसेंबर रोजी आहे. लसीकरणाचा सध्याचा वेग पाहता आता इतक्या कमी कालावधीत हा साठा संपणे कठीण असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ताे फेकून द्यावा लागणार आहे. मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शहरातील नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. बहुसंख्य शहरवासीयांनी पहिले दोन डोस घेतले असले तरी बूस्टर डोस घेणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे मनपाच्या अनेक केंद्रांवर अजूनही बूस्टर डोस देणे सुरू आहे. परंतु तिकडे नागरिक फिरकत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...