आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:एसटीचे 17 अभियंते बदलीच्या ठिकाणी हजर ; शिस्तभंगाची होणार होती कारवाई

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाच्या १७ अभियंत्यांच्या बदल्या झाल्या होत्या. चार दिवस होऊनही काही अधिकारी खुर्ची सोडण्यास तयार नव्हते. बदली रोखण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू होते. याबाबत दिव्य मराठीने २१ सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्याची महामंडळ प्रशासनाने त्वरित दखल घेऊन सर्वांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश दिले. जे जाणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे बजावले. त्यामुळे सर्व अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर झाले आहेत.

एसटी महामंडळात विभाग नियंत्रक म्हणून सचिन क्षीरसागर रुजू झाले आहेत. औरंगाबादेतील किशोर सोमवंशी यांची नाशिकला, जळगावचे श्रावण सोनवणे आणि रत्नागिरीवरून प्रमोद जगताप यांची औरंगाबादला बदली झाली. अशाच प्रकारे एकूण सतरा ठिकाणच्या अभियंत्यांचा यात समावेश होता. मात्र, काही अभियंते खुर्ची सोडायला तयार नव्हते. काहींची इच्छा असूनही बदलीच्या ठिकाणी रुजू होता येत नव्हते. बदली रोखण्यासाठी आर्थिक घोडेबाजारही सुरू झाला होता.

याविषयी वृत्त प्रसिद्ध होताच महामंडळाने दखल घेऊन सर्व अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी जाण्याचे पुन्हा आदेश जारी केले. कारवाईचे संकेत देताच सर्व जण बदलीच्या ठिकाणी हजर होऊन कामालाही सुरुवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...