आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसर्ग:गोवरची लागण झालेल्या 88 पैकी 17 बालकांचे अहवाल पॉझिटिव्ह ; 44 जणांचा अहवाल मिळाला

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात आतापर्यंत गोवरची ८८ बालके संशयित आढळून आली आहेत. त्यापैकी १७ बालकांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अतिरिक्त लसीकरण शिबिरे घेतली जात आहेत. मनपा आरोग्य विभागाकडूनही तपासणी मोहीम सुरू आहे. गेल्या दहा दिवसांपासून गोवर साथीची बालके आढळून येत आहेत. बालकांच्या अंगात ताप आणि पुरळ दिसून येत आहे. गोवर साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी मनपाचे आराेग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे.

चिकलठाणा, विजयनगर, नेहरूनगर भागात गोवरचा उद्रेक झाला आहे. त्यापाठोपाठ इतर भागातही गोवरची बालके आढळून येत आहेत. ८८ पैकी ६१ बालकांच्या रक्ताचे नमुने मुंबईच्या हाफकिन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. तेथून ४४ बालकांचा अहवाल प्राप्त झाला असून १७ जण पॉझिटिव्ह आहेत. १२ जणांचा अहवाल प्रलंबित आहे. १५ बालकांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले. दररोज नवीन भागात गोवरची संशयित बालके आढळून येत आहेत. शुक्रवारी गोवरची आठ संशयित बालके निघाली. त्यात नेहरूनगर, नक्षत्रवाडी, आरेफ कॉलनी, भीमनगर, बायजीपुऱ्यातील रहमानिया कॉलनी, मिसारवाडीतील साईनगर, सातारा परिसरातील आमेरनगर आणि जयभवानीनगर या भागात हे रुग्ण आढळले. या बालकांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत.

उपसंचालकांनी केली पाहणी शहरात गोवरचा फैलाव झपाट्याने होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेचे जिल्हा समन्वयक डॉ. मुजीब शेख, आरोग्य उपसंचालिका डॉ. महानंदा मुंढे यांच्यासह डॉ. मंडलेचा, डॉ. उज्ज्वला भांमरे, डॉ. संध्या नळगीरकर, डॉ. बाळकृष्ण राठोडकर, डॉ. अर्चना राणे, डॉ. मेघा जोगदंड यांनी विजयनगरमधील मल्हार चौक, जयभवानीनगर भागात पाहणी करून सर्वेक्षण केले.

बातम्या आणखी आहेत...