आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइलची मागणी करून तो न मिळाल्याने अकरावीत शिकणाऱ्या बुद्धशीला प्रकाश पोटफोडे (१७) या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. १६ जूनला सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास नायगाव शहरातील फुलेनगर येथे ही दुर्दैवी घटना घडली. नायगाव शहरातील फुलेनगर येथील रहिवासी प्रकाश पोटफोडे हे पती-पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांना दोन मुले व एक मुलगी असून दोन्ही मुलेही मजुरी करून शिक्षण घेतात.
त्यांची बहीण बुद्धशीला ही अकरावीत शिकत हाेती. तिला दहावीला ७५ टक्के गुण मिळाले होते. बारावीत अभ्यासात मागे पडू नये म्हणून तिने अाॅनलाइन शिक्षणासाठी माेबाइल मागितला हाेता. परंतु घरच्यांनी तिला काही दिवसांत देण्याचे आश्वासन दिले होते. पण १६ रोजी तिने घरात गळफास घेऊन जीवन संपवले. दरम्यान, बुद्धशीला अभ्यासात हुशार होती. तिला मोबाइल घेऊनच देणार होतो, पण त्याआधीच तिने टाेकाचे पाऊल उचलल्याचे तिचा भाऊ अमोलने सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.