आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालग्नाच्या वीस वर्षांच्या संसारानंतर पत्नी व दोन मुलींपासून विभक्त होऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने सतरा वर्षे लहान महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये संसार थाटला. त्याच प्रेयसीने पहिल्या प्रियकराच्या मदतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ब्लॅकमेल करीत त्याच्या घरातील लाखोंचे दागिने व बँक खात्यातून ११ लाख रुपये लंपास करून पोबारा केल्याचा प्रकार समाेर आला आहे. वृद्धाने याप्रकरणी न्यायालयात धाव घेतल्यानंतर ती प्रेयसी व आसेफ गुलाब शहा (रा. कुरेशी मोहल्ला, दाैलताबाद) यांच्या विरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६१ वर्षीय शांताराम (नाव बदलले आहे) कौटुंबिक वादातून २००९ मध्ये पत्नी व दोन मुलींपासून विभक्त झाले होते. याचा गैरफायदा घेत ४३ वर्षांच्या राधा (नाव बदलले )ने शांतारामला प्रेमाच्या फसव्या जाळ्यात ओढून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास राजी केले. २०११ पासून दोघेही पडेगावमध्ये सोबत राहत होते. दोघांनी तसा बाँडही केला. मात्र, काही दिवसांतच राधाने शांताराम यांना त्रास द्यायला सुरुवात केली. बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरू केली. त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरी लागावी यासाठी दत्तक मुलगी म्हणूनही त्यांच्याकडून बळजबरीने बाँड लिहून घेतला.
आक्षेप घेताच प्रियकराला घरी आणून मारहाण जुलैत राधाने आसिफच्या मदतीने त्यांना त्यांच्याच घरात मारहाण केली. पहाटे तीन वाजता घरातील कागदपत्रे, ५० हजार रोख रक्कम व चार लाखांचे दागिने घेऊन पळून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिवाय, त्यांचे एटीएम, मोबाइल, सहा लाखांचे दागिने, बाँड पेपर व फोनपेवरून ११ लाख रुपये वळते गेले. आसिफनेदेखील त्यांच्या खात्यातून स्वत:च्या पत्नीच्या बजाजनगरच्या बँक खात्यावर २ लाख रुपये तर राधाच्या छावणी बँक खात्यात ४ लाख रुपये तर स्वत:च्या खात्यात दोन लाख रुपये वळते केले. आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार प्राप्त झाल्यावर त्यांनी पाचही खाती गोठवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.