आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवान पार्श्वनाथ निर्वाण महोत्सव:23 किलोच्या लाडूसाठी 1.71 लाखांची बोली; रक्कम मंदिराला

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान पार्श्वनाथ निर्वाण महोत्सवानिमित्त २३ किलोचा मोतीचूर लाडू भगवंताला अर्पण करण्यात आला. हा लाडू चढवण्याचा मान मिळवण्यासाठी १ लाख ७१ हजार १२३ रुपयांची बोली घाटनांद्रा येथील प्रीती अनिल पाटणी, अरुणा विजय पाटणी यांनी लावली. ही रक्कम मंदिराला दान करण्यात आली.

गुरुवारी सकाळी ७ वाजता राजाबाजार येथील खंडेलवाल दिगंबर जैन पंचायतच्या पार्श्वनाथ मंदिरातून जैन धर्माच्या २४ तीर्थंकरांच्या पालख्या भाविकांनी काढल्या. हिराकाका प्रांगणात शोभायात्रा पोहोचली. भगवान पार्श्वनाथ २३ वे तीर्थंकर असल्याने २३ किलोचा लाडू बनवण्यात आला. १८ वर्षांनंतर चातुर्मासासाठी आलेले आचार्य पुलकसागर महाराज शोभायात्रेत सहभागी होते. जैन तीर्थ सम्मेद शिखरजींचा देखावा उभारला होता. तो उघडण्यासाठीही ८५ हजारांची बोली लावण्यात आली. ललित पाटणी, अशोक अजमेरा, प्रकाश अजमेरा, एम. आर. बडजाते, विनोद लोहाडे उपस्थित होते.

बोलीमध्ये महिलांचीही चुरस
२३ किलोच्या लाडूच्या बोलीस २१ हजार रुपयांपासून सुरुवात झाली. ८५ हजारांपर्यंत पुरुषांनी आकडा नेला. त्यानंतर महिलांनी सहभाग घेतला. चक्क १ लाख ७१ हजारांपर्यंत रक्कम नेली. लाडूच्या निमित्ताने आलेली रक्कम मंदिराला दान म्हणून दिली जाते.

प्रेम, शांती, समता हे जीवनसूत्र
प्रेम, शांती आणि समता ही त्रिसूत्री मानवी जीवन परिपूर्ण करते. हाच संदेश भगवंत पार्श्वनाथांनी दिला. ही त्रिसूत्री जीवनात आचरल्यास जीवन समृद्ध होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असा उपदेश आचार्य पुलकसागर यांनी भाविकांना दिला.

बातम्या आणखी आहेत...