आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान खात्याचा सल्ला:अकरा दिवसांमध्ये पावसाची 17.2 मिमी नोंद, 65 मिमी पर्जन्यमान होईपर्यंत पेरणीची घाई नको

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सूनचा हंगाम सुरू झाला आहे. १ ते ११ जून सकाळी ८.३० वाजेपर्यंत मराठवाड्यात अपेक्षित ४९.१ मिमीच्या तुलनेत १७.२ मिमी म्हणजे ३५ टक्केच पाऊस पडला. गतवर्षी ८१.१ म्हणजेच १६५.२ टक्के पाऊस झाला होता. त्या तुलनेत १३० टक्के पर्जन्यमान कमी झाले आहे. अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे ६५ मिमी पर्जन्यमान होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता असते, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

यंदा लवकर व सरासरी इतका व सरासरी पेक्षा ५ टक्के जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान संस्था, हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. केरळमध्ये लवकर मान्सून दाखल झाला. पण पुढील वाटचालीसाठी अडथळे निर्माण झाल्याने मान्सून रेंगाळला. परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरणाचा अभाव राहिला. परिणामी मराठवाड्यात खूपच कमी म्हणजे अपेक्षित ४९.१ मिमी च्या तुलनेत केवळ १७.२ मिमी पाऊस पडला. मात्र, आता मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू झाली आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात मान्सूनचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे औरंगाबादसह अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते जोरदार पाऊस पडला. दोन ते चार दिवसांत मान्सून सर्वत्र दाखल होईल. मात्र, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन हवामानतज्ज्ञ व कृषितज्ज्ञांनी केले आहे.

जेथे पोषक वातावरण तेथेच पाऊस

मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. दररोज कुठे ना कुठे पाऊस पडताेय. पण जेथे सापेक्ष आर्द्रता १०० टक्के, कमी हवेचा दाब, बाष्पयुक्त ढगांची गर्दी, स्थानिक तापमान, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून पाऊस घेऊन येणाऱ्या ढगांची गर्दी होईल, तेथेच सर्वाधिक पाऊस पडेल. उर्वरित ठिकाणी कमी पर्जन्यमान व पावसाची तूट राहणार आहे. त्यामुळे स्थळनिहाय पर्जन्यमानात कमालीचा फरक राहील.

कोरड्या व अर्धओलाव्यात पेरणी केल्यास धोका

यंदाचा उन्हाळा सर्वाधिक तापल्याने जमिनीतील ओलावा, आर्द्रतेत घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ६५ मिमी पाऊस होईपर्यंत आणि पुढेही पाऊस पडेल, याचा अंदाज घेऊन खरीप पेरणीचे नियोजन करावे. कोरड्या व अर्धओलाव्यात पेरणी केल्यास उष्णतेने बियाण्याची उगवण चांगली होणार नाही. उष्णतेमुळे व कमी पावसामुळे बियाणे खराब होऊन दुबार पेरणीचे संकट ओढवेल. उत्पादन खर्च वाढेल.

बातम्या आणखी आहेत...