आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवस्थापन बुडित:658 किलोमीटरच्या नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी 175 कर्मचारी

औरंगाबाद / प्रवीण ब्रम्हपूरकर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोदावरी नदीला सध्या पुर आलेला आहे. जायकवाडीपासून ते नांदेडपर्यत सर्व गोदावरी दुधडी भरुन वाहत आहे. पैठण ते नांदेडपर्यत ३८७ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जुलैमध्ये पहिल्यांदाच दरवाजे उघडल्यामुळे पुरव्यवस्थापन मोठे आव्हान जलसंपदा विभागासमोर आहे. मात्र अपुरे कर्मचारी हे जलसंपदा विभागासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पुरव्यवस्थापन केले जात आहे. यामध्ये १८ बँरेजेसमध्ये पावणेदोनशे पैकी १५० कर्मचारी कंत्राटी आहेत.

१०२ टीएमसीचे जायकवाडी धरण सध्या ९२ टक्के भरले आहे. जायकवाडीत १९९१ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून एकुण पाणीसाठा २७२९ दलघमी इतका आहे. सध्या जायकवाडीत १३४१५ क्युसेक आवक येत असून जायकवाडीतून ३०४३५ क्युसेक विसर्ग सुरु आहे. तीन सेट्रल कंट्रोल रुममधून आढावा : कडाचे अधिक्षक एस.के.सब्बीनवार यांनी सांगितले की, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड या तीन प्रमुख शहरातील तीन सेंट्रल कंट्रोल रुममधून पुराबाबत आढावा घेतला जातो.बॅरेजेसवर मनुष्यबळ अधिक गरजेचे : पैठण ते बाभळीपर्यत गोदावरीवर १८ बॅरेजेस आहेत. तेथे पूर व्यवस्थापनासाठी ऑपरेटर इलेक्ट्रिशिअन,असिस्टंट मेकॅनिक या शिवाय मनुष्यबळाची गरज आहे.सर्वाधिक १७४ गावे नांदेड जिल्ह्यातील : सहाय्यक अधिक्षक अभियंता जे.एन.हिरे यांनी सांगितले की औरंगाबाद जिल्ह्यातील ४७, जालना ३६,परभणी ८०, बीड ५०, नांदेड जिल्ह्यातील १७४ गावांना इशारा दिला आहे.

नांदेडमध्ये एनडीआरएफ टीम
नांदेडमध्ये एनडीआरएफची टीम कायमस्वरुपी ठेवण्यात आलेली आहे. त्यामध्ये पंधरा लोकांचा समावेश आहे. तसेच त्यांना आवश्यकतेनुसार पुण्यातून माणसे मागवता येणार आहेत. गोदाकाठच्या सर्व लोकांना दवंडी देवून सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.

तीन महिने परीक्षा
वेळेनुसार पाणी सोडणे आणि त्यानुसार डिस्चार्ज करणे हे मुख्य काम पुरव्यवस्थापनात करण्यात येते. जलसंपदा विभागात सर्वत्र मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत.त्यामुळे पुरव्यवस्थापनासाठी देखील कंत्राटी माणसे घेतली आहेत. त्यांच्या भरवशावर एवढे मोठे काम करणे अवघड जात आहे. सर्व बॅरेजेस भरलेले असल्यामुळे आगामी तीन महिन्याचा काळ आमच्यासाठी परीक्षेचा आहे.
एस.के.सब्बीनवार,
अधिक्षक अभियंता कडा औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...