आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रांगदा नाट्य:नोकरी सांभाळून 3 महिने सराव करीत 18 कलावंतांनी सादर केले रवींद्रनाथ टागोर रचित चित्रांगदा नाट्य

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पांडव वनवासात असताना मणिपुरात गेले होते. यावेळी अर्जुनावर राजकुमारी चित्रांगदा मोहित हाेती. त्याला प्रेम प्रस्तावही देते. पण, अर्जुन हा प्रस्ताव नाकारतो. मात्र, जेव्हा राजकुमारी युद्ध विद्या आणि सौंदर्याचे पैलू उलगडते तेव्हा अर्जुनही तिच्यात गुंफला जातो, ही रविंद्रनाथांच्या लेखणीतून आलेली कहाणी बंगाली असोसिएशनच्या मंचावर पाहायला मिळाली. हे नाट्य उभारण्यासाठी १८ कलावंत, ३ महिने नोकरी-व्यवसाय सांभाळूून सराव करत आहे

शहरात असोसिएशन मागील ४६ वर्षांपासून दुर्गाेत्सव साजरा करते. या वेळी विविध धार्मिकसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. स्पर्धाही घेतल्या जातात. रांगाेळी, अंताक्षरी, प्रश्नमंजूषा स्पर्धेसोबतच धूप हातात घेऊन धोनुची नृत्य, सिंदूर खेलाचे आकर्षण असते. मात्र, सर्वाधिक लक्षवेधी ठरले ते चित्रांगदा नाट्य. डॉ. पार्थाे रे आणि त्यांच्या पत्नी सोमा रे यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक होते.

४५ मिनिटांच्या या नाटकात विविध प्रसंग ताकदीने साकारण्यात आले होते. बंगाली भाषेतील हे नाट्य पाहण्यासाठी बंगाली बांधवांसह इतरांनी गर्दी केली होती. समृद्ध साहित्य आणि रवींद्रनाथांची सकस लेखणी या नाट्याचा आत्मा ठरली. चित्रांगदा आणि अर्जुनाची भूमिका साकारलेल्या कलावंतांनी ताकदीचा अभिनय केला.

नृत्य-नाट्याचा मिलाफ
या नाटिकेत नृत्य आणि नाट्याचा मिलाफ आहे. विशेष म्हणजे प्रत्येकाने कामातून वेळ काढूून यामध्ये जीव ओतून काम केले. समाजाचा वर्षभरातील हा एकच उत्सव विशेष असतो. या उत्सवात केलेल्या नाटकामुळे आजच्या पिढीपर्यंत कथा पोहोचते. - सोमा रे, दिग्दर्शक.

बातम्या आणखी आहेत...