आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोटाळा:18 कोटींच्या जीएसटी घोटाळा तपासात 500 कोटी रु.ची करचोरी चव्हाट्यावर, औरंगाबाद जीएसटी अन्वेषणने केला पर्दाफाश

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईतील दोघांना अटक,

बनावट कागदपत्रांच्या आधारे १८ कोटींच्या जीएसटी घोटाळ्याचा शोध घेत असलेल्या औरंगाबाद अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील डोंगरी व मशीद बंदरपर्यंतचे धागेदोरे शोधत ५०० कोटींच्या जीएसटी चुकवेगिरीचा घोटाळा उघडकीस आणला आहे. या प्रकरणी वस्तु व सेवा कर कायद्याअंतर्गत फैसल व अजिज अशा दोघांना मुंबहून अटक करण्यात आली. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

बनावट आधारकार्ड आणि बनावट पँनकार्ड याच्या आघारे वस्तू व सेवा कर नोंदणी घेऊन बँकेत खाते उघडून १८ कोटींचा कर चुकवल्या प्रकरणी मे. फरहत एन्टरप्राईटविरोधात जीएसटीच्या औरंगाबाद अन्वेषण शाखेने तपास सुरू केला होता. या तपासणीत या कंपनीच्या औरंगाबाद आणि मुंबईतील डोंगरी व मशीद बंदर येथील कार्यालयांवर तपास अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. तेेथील तपासणीत मे. फरहत एन्टरप्रायईजचा नोंदणी दाखला गुजरात राज्यातील राजकोट येथील प्रोप्रायटर दावेद अजितभाई हसनानी यांच्या नावे असल्याचे आढळून आले. या दाखल्यावर फरहत एन्टरप्राईजने १२१ कोटींची बनावट बिले दाखवून १८ कोटींचे वस्तू व सेवा कर इनपुट टॅक्स क्रेडीट हस्तांतरित केल्याचे आढळून आले. ही कारवाई जीएसटी विभागाचे अप्पर राज्य कर आयुक्त सुभाष ऐंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ. प्रविणकुमार राठी, सहायक आयुक्त नितेेश भंडारे, प्रकाश गोपनर यांनी केली.

बनावट आधार, पॅन, डेबिट कार्डचा वापर करून बिले फैजल व अजीज या दोन आरोपींकडून बनावट आधार कार्डासह बनावट पॅन कार्ड, डेेबिट, सिम कार्ड आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या अनेक वस्तू व सेवा कर (जीएसटी) नोंदणी दाखल्यांद्वारे आतापर्यंतच्या तपासात ५०० कोटींच्या वर बनावट बिले दिल्याचे उघडकीस आले.

बातम्या आणखी आहेत...