आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीतून 18 हजार क्युसेकने वाढला पाण्याचा विसर्ग:31 वर्षांनतर पहिल्यांदाच जुलै महिन्यात उघडले 18 दरवाजे; नागरिकांना दक्षतेचा इशारा

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी सायंकाळी जयकवाडी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर 18 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. दरम्यान हे 18 दरवाजे एक फूटाने उघडण्यात आले आहे.

धरणात 92% पाणीसाठा

जायकवाडी धरणात 92 टक्के पाणी साठा झाला आहे. त्यामुळे जुलै महिन्यात तब्बल 31 वर्षानंतर जायकवाडीचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. यापुर्वी 30 जुलै 1991 ला जायकवाडीचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर 25 जुलै 2022 मध्ये जुलै महिन्यात दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे.

31 वर्षांनतर उघडले दरवाजे

जायकवाडी धरण भरल्यामुळे मराठवाड्यातल्या 1 लाख 84 हजार हेक्टरला सिंचनासाठी फायदा होतो. औरंगाबाद जालनाबीड परभणी जिल्ह्याला सिंचनासाठी फायदा होतो. जायकवाडी धरणातून 1977 मध्ये आणि 1978 मध्ये जुलै महिन्यात धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर 30 जुलै 1991 मध्ये हे पाणी धरणातून सोडण्यात आले आहे.

दक्षतेचा इशारा

नादुरमधमेश्वर मधून 12 हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तर जायकवाडीत 31 हजार क्यूसेक आवक येत आहे. त्यामुळे जायकवाडी मधून विसर्ग वाढवला आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षापासून धरण सलग भरत आहे. गेल्या वर्षी 29 सप्टेंबरला धरणातून गेट उघडून पाणी सोडण्यात आले होते. सोमवारी 9432 विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर यामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे गोदा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...