आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज गुल:देवळाईत तारा तुटल्याने तब्बल 18 तास वीज गुल ; नंतर समस्या दूर, आता फांद्या तोडाव्या लागणार

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे देवळाई परिसरातील आभूषण पार्क येथील पथ खांबांवरील तारा तुटून पडल्याने रात्री दहा वाजेपासून वीज गुल ‌झाली. अठरा तासांनंतर पुरवठा सुरळीत झाला. देवळाई भागातील आभूषण पार्क येथे रात्री दहा वाजेच्या सुमारास वाऱ्यामुळे विद्युत पोलवरील तारांवर झाडाची फांदी पडल्याने तारा तुटल्या. अचानक पडलेल्या तारांमुळे परिसरातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यावेळी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी येऊन विद्युत तारा बाजूला केल्या. रात्री साडेदहा वाजेपासून विद्युतपुरवठा खंडित झाल्या कारणाने रात्र अंधारात काढावी लागली. सकाळी विद्युतपुरवठा सुरळीत होईल असे अपेक्षीत असताना कर्मचारी फिरकले नाहीत. नागरिकांनी वीज वितरण विभागाला संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. एकीकडे रस्त्यावर पडलेल्या विद्युत तारा असताना दुरुस्तीचे काम केले जात नव्हते. दुपारी चार वाजले तरी विद्युतपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. तब्बल अठरा तास उलटले तरी वीज नसल्याने अनेकांचे मोबाइल्ससुद्धा चार्जिंग न झाल्याने बंद पडले हाेते. अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले. विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रूपाली पवार, दत्तात्रेय मोरे, राजेंद्र चव्हाण, किरण भंडे, दीपक मरमटे, पंकज जाधव आदी नागरिकांनी केली. महावितरणचे अभियंता दादासाहेब काळे म्हणाले की, आभूषण पार्क भागातील झाडामुळे विद्युतपुरवठा खंडित झाला. ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी या रस्त्यावरील झाडांच्या फांद्या तोडाव्या लागतील. विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी कंडक्टर बसवावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...