आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:वाळूजमध्ये 18 वर्षीय तरुणीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या; कारण् अद्याप अस्पष्ट

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरात एकटीच असल्याची संधी साधून वाळूज येथील समता कॉलनीत राहणाऱ्या मयुरी संजय थोरात (18 वर्ष) या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 7 जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत अधिक माहिती आशी की, 7 जून रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास मयुरीचे वडील संजय थोरात व आई ज्योती थोरात हे दोघे कंपनीत कामासाठी निघुन गेले होते. तर, मयुरी लहान बहीण राणी व शुभम हे तिन्ही भावंडे घरीच होते.दरम्यान दुपारी 12 वाजेच्या सुमारास राणी वाळूज येथील स्वस्त धान्य दुकानात राशन घेण्यासाठी गेली होती. तर शुभम हा खाजगी क्लाससाठी घराबाहेर पडला होता. घरात कोणीही नसल्याची संधी साधत मयुरीने स्वयंपाक घरातील छताच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.

थोड्या वेळाने कामानिमित्त शेजारी राहणारे नितीन मोकळे हे थोरात यांच्या घरी गेले असता त्यांना मयुरी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी आरडा-ओरड करत ही घटना परीसरात इतरांना सांगितली. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिस ठाण्याचे फौजदार लक्ष्मण उंबरे, सहायक फौजदार सखाराम दिलवाले, महिला पोलिस कर्मचारी एसव्ही भगुडे, चालक मोहन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत बेशुद्ध अवस्थेतील मयुरीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषीत केले. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयुरी गळफास का घेतली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही कारण स्पष्ट होईल असे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...