आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:वाळूजमध्ये 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या ; वाळूज ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील समता कॉलनीतील मयूरी संजय थोरात (१८) या तरुणीने स्वयंपाकघरातील छताच्या अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ७ जून रोजी दुपारी १२:३० वाजता उघडकीस आली. मंगळवारी सकाळी ६ वाजता मयूरीचे वडील संजय थोरात व आई ज्योती थोरात दोघेही कंपनीत गेले होते. मयूरी व बहीण राणी आणि भाऊ शुभम घरीच होते. दरम्यान, दुपारी १२ वाजता राणी स्वस्त धान्य दुकानात रेशन घेण्यासाठी गेली होती, तर शुभम खासगी क्लासला गेला हाेता. त्यानंतर घरात कोणीही नसल्याने मयूरीने गळफास घेतला. त्यानंतर शेजारी नितीन मोकळे कामानिमित्त थोरात यांच्या घरी गेले असता, त्यांना मयूरी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी हा प्रकार परिसरातील इतरांना सांगितला. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिस ठाण्याचे फौजदार लक्ष्मण उंबरे, सहायक फौजदार सखाराम दिलवाले, महिला पोलिस कर्मचारी एस. व्ही. भगुडे, चालक मोहन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत बेशुद्ध अवस्थेतील मयूरीला घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी वाळूज ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली.

बातम्या आणखी आहेत...