आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजेरीवर लक्ष:कायम गैरहजर असलेले मनपातील 19 कर्मचारी तडकाफडकी निलंबित

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वारंवार गैरहजर राहणाऱ्या मनपातील १९ कर्मचाऱ्यांना सोमवारी (१९ डिसेंबर) मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी तडकाफडकी निलंबित केले. त्यापैकी दोन कर्मचारी कंत्राटी तर १७ कर्मचारी मनपाच्या आस्थापनेवर आहेत. मनपा मुख्यालयात आणि झोन कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसल्याने अनेक कामे रखडली आहेत. मनपा आयुक्तांनी त्यांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. तसेच कायम गैरहजर राहणाऱ्यांना नोटीसही दिली होती. त्यांच्या हजेरीवर लक्ष ठेवण्यात आले होते. सोमवारी हा अहवाल चौधरी यांनी मागवला व कायम गैरहजर राहणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांना निलंबित केले. यातील बहुतांश कर्मचारी वर्ग ४ मधील आहेत. सफाई कामगारांसोबतच ३ कंत्राटी स्वच्छता निरीक्षकांवरही कारवाई करण्यात आली आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय दैनिक वेतनावरील २ कर्मचाऱ्यांनाही काढून टाकण्याचे आदेश आयुक्त चौधरी यांनी दिले आहेत.

अतिरिक्त आयुक्त निकम यांना नोटीस सूचना देऊनही अतिक्रमण काढण्यात दिरंगाई केल्याबद्दल आयुक्त चौधरी यांनी अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभागाचे प्रमुख रवींद्र निकम यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...