आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:उमरदरा शिवारामध्ये 19 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, घटनेमुळे तरुणाची आई 24 तासापासून बेशुद्ध

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील उमरदरा शिवारामध्ये एका १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेमुळे त्याचा आईला मानसिक धक्का बसला असून त्या मागील चोविसतासा पासून बेशुद्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील नितीन भाऊराव जटाळे (१९) हा औरंगाबाद येथे बीएससी प्रथम वर्ष मध्ये शिक्षण घेतो.  संचारबंदी मुळे मागील काही दिवसांपूर्वी तो गावाकडे आला आहे. दिवसभर उमरदरा शिवारातील शेतात थांबून अभ्यास करणे रात्री घरी परत येणे असा त्याचा दिनक्रम सुरू होता. शुक्रवारी सकाळी तो शेतात गेला. त्यानंतर काही वेळातच त्याने शेतातील आखाड्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास त्याचे नातेवाईक  झोपडी जवळ आले असता आत्महत्येचा प्रकार  त्यांना दिसला. त्यांनी याची माहिती मयत नितीन जटाळे याच्या कुटुंबियांना दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळावर नितीन जटाळे यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

 याप्रकरणी सचिन जटाळे यांच्या माहितीवरून आखाडाबाळापुर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, जमादार शेख बाबर यांनी भेट दिली आहे.

दरम्यान सदर घटना  मयत नितीन याच्या आईला कळताच त्यांना चांगलाच मानसिक धक्का बसला. त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना उपचारासाठी वारंगा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अद्यापही त्या शुद्धीवर नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.