आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:जिल्ह्यात सारीच्या आजारामुळे एका तरुणीचा मृत्यू, आठ जण आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल, स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले

हिंगोली3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • एका कोरोना संशयीताचा अहवाल निगेटीव्ह

हिंगोली जिल्हयात ‘सारी’च्या आजारामुळे एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर तिच्या कुटुंबातील आठ जणांना हिंगोलीच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आले असून त्यांचे स्वॅब नमुने बुधवारी तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील एका 19 वर्षीय तरुणीला सर्दी, खोकला व दम लागण्याचा त्रास सुरु झाला होता. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तीला उपचारासाठी परभणी येथे दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असतांनाच रविवारी तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार,  निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. नारायण भालेराव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड यांच्या पथकाने तिच्या गावात जाऊन तिच्या कुटुंबियांची भेट घेतली. तिच्या मृत्यूबाबत विचारणा केल्यानंतर तिला सारीचा आजार झाला होता हे स्पष्ट झाले. त्यावरून आरोग्य पथकाने तिच्या कुटुंबियांनी तसेच तिला उपचारासाठी नेलेल्या वाहन चालकास अशा एकूण आठ जणांना हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड मध्ये मंगळवारी दाखल केले आहे. त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी आैरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. या आठ जणांच्या अहवालाची प्रतिक्षा आरोग्य विभागाला लागली आहे.

एका कोरोना संशयीताचा अहवाल निगेटीव्ह
जिल्ह्यात एका कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 29 वर्षीय तरुणास शासकिय रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्ड मध्ये ठेवण्यात आले आहे. त्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी आैरंगाबाद येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल बुधवारी ता. 8  प्राप्त झाला असून सदर अहवाल निगेटीव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...