आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:19 वर्षीय मुलीने आखेर चुप्पी तोडली,आईच्या मदतीने बापाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज बजाजनगर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या ४० वर्षीय बापाने स्वतःच्या मुलीचाच विनयभंग केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. मागील वर्षभरापासून वडीलांचा त्रास सहन करणाऱ्या मुलीला अखेर मानसिक बळ दिल्याने मुलीने आईसह वाळूज एमआयडीसी पोलिसांत धाव घेत वडीलाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत मुलगी ही घरातील सर्वात मोठी असून तिला लहान दोन बहिणी आहेत. आई-वडील दोघेही कंपनीमध्ये काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. मागील वर्षभरापासून पिडीतेस तिचे वडील वाईट नजरेने पाहून तिची छेड काढत असत. मात्र, या प्रकाराची तिने कुठेही वाच्यता केली नाही. दरम्यान वडीलांचा त्रास वाढल्याने तिने हा प्रकार आईला सांगितला. मात्र, त्यावर वडीलांनी मुलीसह तिच्या आईस मारहाण केली. दरम्यान घटनेच्या दिवशी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास साखर झोपेत असणाऱ्या मुलीची छेड तिच्या वडीलांनी काढली. अचानक जाग आलेल्या पिडीत मुलीने आरडाओरड करताच आई व इतर बहिणी झोपेतून उठल्या. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. पुढे मुलींसह आईने पोलिसांत धाव घेतली असता मुलीने आपबीती पोलिसांना सांगितली. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या आदेशाने तात्काळ गुन्हा दाखल करत पुढील तपास महिला पोलिस अधिकारी प्रिती फड यांच्याकडे तपास सुपूर्द करण्यात आला.