आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ वसाहतींत सर्वेक्षण:3000 पैकी 1900 महिला अॅनिमिक; योग्य आहार, उपचारातून केली मात

औरंगाबाद / रोशनी शिंपीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील ७ वस्त्यांमधील ३ हजार महिलांचे सर्वेक्षण सावित्रीबाई फुले एकात्म विकास मंडळाच्या माध्यमातून केले. यामध्ये अॅनिमिक आढळलेल्या १९०० महिलांना ‘रमा’ प्रकल्पाने सहाच महिन्यांत खाण्याच्या सवयी, आहारात बदल, औषधोपचार करून अॅनिमियामुक्त केले. या प्रकल्पाला ग्राइंडमास्टर कंपनीने निधी उपलब्ध करून दिला.

प्रकल्पप्रमुख वर्षा पिंपळे म्हणाल्या, १ जून २०२१ मध्ये मिलिंदनगर, हमालवाडा, मुरलीधरनगर, कबीरनगर, फुलेनगर, नागसेननगर, महुनगर या वस्त्यांमध्ये ३८२ महिला माइल्ड, १३४६ मॉडरेट, ३०६ महिला सिव्हियर (गंभीर) तर उर्वरित नॉर्मल आढळल्या. सिव्हियर अॅनिमिक महिलांना ३ महिने औषधोपचार केले. तर माइल्ड, मॉडरेट महिलांना आहारात बदल सूचवण्यात आले.

आहारासाठी प्रशिक्षण
आहाराच्या सवयी बदलण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये त्यांना बाजरीची खिचडी, पत्ताकोबी, फुलकोबीचे पराठे, आळिवाची खीर, शेवग्याचे थालपीठ असे पदार्थ शिकवण्यात आले. याशिवाय विविध प्रकारच्या चटण्या, लाडू शिकवले.

लोखंडी कढईत स्वयंपाक
लोखंडी भांड्यात स्वयंपाक केल्याने लोह भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे विविध स्पर्धांच्या माध्यमातून रमा आयडॉल पुरस्कार दिले. १८०० लोखंडी कढयांचे वाटप केले. प्रकल्प अधिकारी सुजाता दाभाडे, कार्यकर्ती दीक्षा रगडे, गीता जाधव काम करत आहेत. तीन वर्षांचा हा प्रकल्प आहे.

असे मिळाले प्रकल्पाला यश
रमा समिती स्थापन करून १२ महिला प्रत्येक वस्तीत निवडण्यात आल्या. या सर्वांची दरमहा बैठक घेऊन आरोग्यावर चर्चा केली. ३० जणींसाठी विशेष चार प्रशिक्षण घेतले. यामध्ये डॉ. अस्मी भट, डॉ. दीपा पाटगावकर, डॉ. यज्ञेश्वर कुलकर्णी, डॉ. आदित्य वैद्य, डॉ. प्रतिभा अघाटे यांनी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...