आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती प्रक्रिया:महिला व बालविकास विभागात 195 जागा ; 19 ऑगस्ट अर्ज करण्याची अंतिम मुदत

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागात कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर १९५ पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. १८ ते ४३ वयोगटातील अर्हता प्राप्त उमेदवारांना अर्ज करता येईल. १९ ऑगस्टच्या रात्री ११:५९ वाजेपर्यंत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन आयुक्त राहुल महिवाल यांनी केले आहे.

महिला व बालविकास विभागात कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर विविध १९५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांची १० पदे आहेत. संरक्षण अधिकारी-२०, कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी-२१, समुपदेशक-१५, सामाजिक कार्यकर्ता-२३, लेखापाल-१८, डेटा विश्लेषक-१३, सहाय्यक डेटा एंट्री ऑपरेटर-५०, आउटरीच वर्कर-२५ आदी पदांच्या एकूण १९५ जागा भरण्यात येणार आहेत. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी पदासाठी पदव्युत्तर शिक्षण असणे गरजेचे आहे. तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. संरक्षण अधिकारी होण्यासाठीही पीजी आवश्यक आहे. कायदेशीरसह परीविक्षा अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्यांचे शिक्षण विधी शाखेत होणे गरजेचे आहे. समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता आणि लेखापाल पदासाठी पदवी आणि एक वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. डेटा विश्लेषक पदासाठी सांख्यिकीशास्रातील पदवी असणे अनिवार्य आहे. आऊटरिच वर्कर आणि सहायक डेटा एंट्री ऑपरेटरसाठी किमान १२ वी उत्तीर्ण आणि उत्कृष्ट संवाद कौशल्य असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची राज्यात कुठल्याही जिल्ह्यात काम करण्याची तयारी असली पाहिजे, असे जाहिरातीत नमूद केले आहे. इच्छुक उमेदवारांनी www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावे, असे आवाहन राहुल महिवाल यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...