आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘इंद्रधनुष्य’ महोत्सवात विद्यापीठ संघाला 4 पारितोषिके:शॉर्टफिल्म, इन्स्टॉलेशनमध्ये प्रथम, मृदुमुर्ती कलेत दुसरे तर एकांकिकेत तृतीय बक्षीस

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने इंद्रधनुष्य या राज्यस्तरीय युवक महोत्सवात चार पारितोषिके पटकावली आहेत. शॉर्टफिल्म आणि इन्स्टॉलेशनमध्ये प्रथम, मृदुमुर्ती कलेत दुसरे तर एकांकिकामध्ये तृतीय बक्षीस मिळाले आहे. चार कला प्रकारात विद्यार्थी कलावंतांनी बाजी मारली आहे. आता जानेवारीत होणाऱ्या पश्चिम विभागीय युवा महोत्सवाची तयारी सुरू केली आहे.

राहूरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात 5 ते 9 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या महोत्सवात 39 जणांचा संघ होता. ऋषीकेश भुतेकर या विद्यार्थ्याने’इन्स्टॉलेशन’ या कला प्रकारात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकले. त्याशिवाय शॉर्टफिल्ममध्ये प्रथम पारितोषिक मिळाले आहे. त्यात दुर्गेश्वरी अंभोरे, समीर विरुटकर, वैष्णवी दांडगे, प्रतिषा कुरडले, प्रिया सोनुने, मृणाल देशपांडे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. एकांकिकेत तृतीय क्रमांक मिळाला आहे. त्यामध्ये विशाल रणदिवे, अक्षता किरकसे, सतीश धोत्रे, गणेश रोडगे, सोमनाथ भंडारे, औंकार वट्टे यांनी भूमिका केल्या होत्या.

मृदुमुर्तीकला या प्रकारात ऋषिकेश मुऱ्हेकर या विद्यार्थ्याने दुसऱे स्थान पटकावले आहे. इॅस्टालेशनमध्ये विशाल घुगे, विशाल धुमाळ, वेदांत वनशिंगे, सौरभ श्रीभाते यांचा समावेश होता. त्यांनी प्रथम पारितोषिक मिळवले आहे. यंदा मुंबई विद्यापीठाच्या संघाने 14 बक्षिसे मिळवत सर्वोत्कृष्ट संघाचे पारितोषिकावर नाव कोरले.

मागील 20 वर्षांपासून मुंबई विद्यापीठाचा इंद्रधनुष्य महोत्सवात दबदबा आहे. यशस्वी कलावंतांचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे, अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. वाल्मीक सरवदे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. संजय सांभाळकर, प्रकाश आकडे आदींनी सर्व कलावंतांचे अभिनंदन केले आहे. संघ व्यवस्थापन डॉ. निर्मला जाधव, डॉ. गणेश शिंदे, व्यवस्थापक गौतम सोनवणे यांनी संघाला मार्गदर्शन केले होते.

महोत्सवात कृषी विद्यापीठाने अतिशय नेटके नियोजन केले होते. भोजन, निवास व्यवस्थेसह इतर सुविधांविषयी कौतिकच करावे लागेल. 28 पैकी आम्ही 26 कलाप्रकारात भाग घेतला होता. त्यात 4 बक्षिसे मिळवलेे आहेत. पुण्यात पश्चिम विभागीय युवा महोत्सव होणार आहे. त्यावेळी विद्यापीठाचा संघ पूर्ण तयारीने उतरणार आहे.

-डॉ. गणेश शिंदे, संघप्रमुख

बातम्या आणखी आहेत...