आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर:‘मिशन 29’ला प्रथम, ‘आम्ही जगतो आयटीत’ला दुसरे बक्षीस

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने १७ सप्टेंबरपासून ते २ जानेवारीपर्यंत झालेल्या नाट्य स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी झाला. या वेळी मिशन-२९ या नाटकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तर आम्ही जागतो आयटीत या नाटकास द्वितीय, विसर्जन या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने उस्मानपुरा येथील ललित कला भवनमध्ये नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नाट्यकर्मी शिवदर्शन कदम, बजाजचे बाबासाहेब लालतुरे, कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत, प्रभारी सहायक आयुक्त मनोज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला.

‘विसर्जन’ नाटकाला तिसरे पारितोषिक कामगार कल्याण केंद्र अंबाजोगाईचे मिशन २९ नाटकाला प्रथम, तर आम्ही जगतो आयटीत (कामगार कल्याण केंद्र शहाबाजार ) यांना दुसरे, विसर्जन (कामगार कल्याण केंद्र बजाजनगर) यांना तिसरे, अचानक (कामगार कल्याण केंद्र, छावणी) , दानव (कामगार कल्याण केंद्र, वसमत) यांना देण्यात आला. तसेच सर्वाेत्कृष्ट अभिनय पुरुष– आदित्य विध्वंस, सर्वाेत्कृष्ट अभिनय महिला– अबोली जोशी, उत्कृष्ट दिग्दर्शन– प्रदीप भोकरे, उत्कृष्ट नैपथ्य– विजय क्षीरसागर, उत्कृष्ट पार्श्वसंगीत– अजिंक्य कांबळे, उत्कृष्ट प्रकाश योजना– आनंद सरवदे यांना पारितोषिक देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...