आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 वर्षांपासून बांधकाम सुरू:छत्रपती संभाजीनगरमधील हज हाऊससाठी आणखी 2 कोटी मंजूर, डिसेंबरमध्ये उद्घाटनाची शक्यता

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठ वर्षांपासून किलेअर्क येथे बांधकाम सुरू असलेल्या हज हाऊसचे उद्घाटन डिसेंबर २०२४ मध्ये होण्याची शक्यता आहे. कारण मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या या इमारतीच्या अखेरच्या टप्प्यातील कामांसाठी २ कोटी १४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यासाठीचा आदेश ३१ मार्च रोजी जारी करण्यात आला आहे.

अल्पसंख्याक विभागाच्या कार्यासन अधिकारी परवीन जुगारी यांनी निधी वाटपाचा आदेश काढला आहे. त्यात म्हटले आहे की, एकूण ४४ कोटी रुपयांत सिडकोने हज हाऊस बांधावे, असे ठरले होते. त्यानुसार उर्वरित व अंतिम हप्त्यापोटी दोन कोटी १२ लाख रुपये सिडकोला देण्यात येत आहेत. या रकमेतून राहिलेली सर्व कामे पूर्ण करून त्याची उपयोगिता प्रमाणपत्रे शासनाकडे एक महिन्यात सादर करावीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता सिडको प्रशासनाकडून निविदा काढल्या जातील. ठेकेदारामार्फत नोव्हेंबरपर्यंत कामे पूर्ण होऊन डिसेंबर २०२४ मध्ये हज हाऊसचे उद्घाटन व्हावे, असा प्रयत्न होत आहे.

हज हाऊस आणि वंदेमातरम सभागृह बांधकामाचे आश्वासन पाळले नाही तर राजकीय नुकसान होऊ शकते, असे लक्षात आल्यावर २०१३ मध्ये तिजोरीचे दरवाजे राज्य शासनाने काही प्रमाणात उघडले. मात्र, संथगतीने निधी वितरणाचे धोरण ठेवण्यात आले. त्यामुळे आठ वर्षांनंतर म्हणजे ९ आॅगस्ट २०२२ रोजी वंदे मातरम सभागृह खुले झाले. त्याच वेळी हज हाऊसचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर निधीअभावी काही कामे रखडल्याचे सांगण्यात आले होते.