आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:हर्सूलमध्ये ठेकेदाराचे घर फोडून 2 लाख लांबवले ; हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हर्सूल परिसरातील मयूरपार्क, म्हसोबानगरात घरफोडीच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा घरी कुणी नसल्याने संधी साधून एका ठेकेदाराचे घर फाेडून चोरट्यांनी राेख २ लाख १० हजार रूपये लंपास केले. ही घटना १७ डिसेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी १८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

संतोष शिवरूपराव मोटेगावकर (४३, रा.म्हसोबानगर, हर्सूल) ठेकेदार असून, गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची पत्नी आजारी असल्याने त्या माहेरी राहतात. शनिवारी सकाळी ८ वाजता संतोष कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर १६ वर्षीय मुलगाही शाळेत गेला. शाळा सुटल्यानंतर मुलगा जेवन करण्यासाठी घरी न येता काकाच्या घरी गेला. तर संतोषही जेवणासाठी रात्री भावाच्या घरी गेले. शेजाऱ्यांनी रात्री १० वाजता त्यांना फोन करून, तुमच्या फ्लॅटचे कुलूप तुटल्याची माहिती दिली. ते घरी गेल्यानंतर कुलूप व दोन्ही बेडरूमची दारे तुटलेली दिसली. आतील कपाटाच्या लॉकरमधून चोरट्यांनी दोन लाख दहा हजार रुपये लंपास केल्याचे लक्षात आले. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात १८ डिसेंबर रोजी तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक रफिक शेख तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...