आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिपाणी वाजवण्यास मनाई केल्याने तरुणाचा खून:मुख्य आरोपीनंतर आणखी दोन जणांना अटक, दोन दिवसांची पोलिस कोठडी

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिपाणी वाजविण्‍यास मनाई केल्याने तरुणाला बेदम मारहाण करुन त्‍याचा खून करण्‍यात आल्याची घटना औरंगाबादेत २७ सप्‍टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी तपास करुन आणखी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. दोघा आरोपींना २१ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी शाहिद यांनी आहेत.

रोहन साळवे (वय २१) आणि श्रीजत आदमाने (वय १८) अशी आरोपींची नावे आहेत. यापूर्वी गुन्‍ह्यात आरोपी आकाश ऊर्फ आदित्‍य बादाडे याला पोलिसांनी अटक केली होती.

नेमके प्रकरण काय?

प्रकरणात मयत श्रीकांत बाबासाहेब मोतीचुर (१८, रा. प्रतिज्ञानगर) यांची आई अनिता मोतीचुर (३३) यांनी फिर्याद दिली होती. तक्रारीनुसार २७ सप्‍टेंबर रोजी रात्री साडे आठ वाजेच्‍या सुमारास श्रीकांत हा गावातून जात असताना एक अल्पवयीन मुलगा रस्‍त्‍यात यात्रेतून आणलेली पिपाणी वाजवत होता. श्रीकांतने त्‍याला पिपाणी वाजवू नको, असे सांगितले असता अल्पवयीन मुलाने श्रीकांतला शिवीगाळ करुन बघुन घेण्‍याची धमकी दिली.

रस्त्यावर बेदम मारहाण

धमकीनंतर श्रीकांत व त्‍याचा मीत्र दोघे श्रीकांतच्‍या घराकडे जात होते, त्यावेळी आरोपी आकाश ऊर्फ आदित्‍य बादाडे, श्रीजात आदमाने आणि दोन अल्पवयीन मुलांनी त्‍यांचा रस्‍ता अडवला. श्रीकांतला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करित आरोपींपैकी एकाने श्रीकांतला फरपटत डांबरी रोडवर आणले. तेथे आरोपींनी पुन्‍हा बेदम मारहाण केली. बेशुद्ध अवस्‍थेत श्रीकांतला प्रथम खासगी आणि नंतर घाटी रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. उपचार सुरु असताना श्रीकांतची प्राणज्योत मालावली. प्रकरणात सातारा पोलिस ठाण्‍यात खुनाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

जुन्या भांडणातून कृत्य?

दोघा आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता सहायक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी दोघा आरोपींना गुन्‍हा करण्‍यासाठी कोणी प्रवृत्त केले होते काय, श्रीकांतला मारहाण करण्‍याचा हेतु काय होता, आरोपींचे श्रीकांतसोबत यापूर्वी भांडण झाले होते का? याचा तपास बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...