आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी पाणीपट्टी आकारणी 50 टक्क्यांवर:वर्षाला 2 हजार 25 रुपयेच पाणीपट्टी भरावी लागणार; मालमत्ता कराचीही बिल येणार एकत्र

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अपुरे पाणी, त्यातही वाढीव पाणीपट्टीमुळे औरंगाबादेत नागरिकांतून रोष व्यक्त केला जात होता. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेकडून आकारली जाणारी 4 हजार 50 रुपयांची पाणीपट्टी 50 टक्के कमी करण्याचा निर्णय पालकमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर केला.

या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पालिका प्रशासकांनी नियुक्त समितीने चालू वर्षापासून पाणीपट्टी 50 टक्के कमी करणे, आर्थिक तुट भरुन काढण्यासाठी उपाययोजना करणे आणि मालमत्ता कर, पाणीपट्टी या दोन्ही बिलांचे संयुक्त एक बिल देणे, असा अहवाल सादर केला. त्यामुळे पाणीपट्टी 50 टक्के कमी करण्याचा प्रस्ताव घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात शहराचा पाणीप्रश्‍न गंभीर बनल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालत तातडीने उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालकमंत्री सुभाष देसाई यांनी तातडीने उपाययोजना राबविण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेतला. पाणीपट्टी कमी करण्याच्या नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी पाणीपट्टी 50 टक्के कमी करण्याचा निर्णय जाहीर केला.

पालिकेने तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले. त्यानुसार पालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपट्टी 50 टक्के कमी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकार्‍यांची समिती गठीत केली. या समितीने अभ्यास करुन पाणीपट्टी कमी केल्यास त्याचा पालिकेच्या आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे दिसून आले.

त्यानुसार चालू आर्थिक वर्षापासून पाणीपट्टीच्या दरात 50 टक्के कपात करणे, 50 टक्के रक्कम कमी झाल्यावर आर्थिक तुट भरुन काढण्यासाठी उपाययोजना राबविणे, मालमत्ता कर व पाणीपट्टी या दोन्ही बिलाचे एक संयुक्त बील देणे या बद्दलचा अहवाल प्रशासकांकडे सादर केला. या अहवालनुसार पाणीपट्टी 50 टक्के कमी करण्याचा प्रस्ताव घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच पाणीपट्टी अर्धी केल्यावर वसूल न होणारी रक्कम निर्लेखित करणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र पालिका अधिनियमाचे कलम 152 अन्वये आयुक्तांस अधिकार प्रदान केले आहे.

बातम्या आणखी आहेत...