आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलकुंभ वापराविना:2 जुने जलकुंभ पाडून तेथेच नवीन बांधणार ; पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी भोपाळहून रेडिमेड पाइप येण्यास सुरुवात झाली. आता हर्सूल आणि सिल्क मिल कॉलनी येथील जुने जलकुंभ पाडून त्या ठिकाणी नवीन जलकुंभ बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

१६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे. आता शहरात उंचावरील ४९ जलकुंभ तर जमिनीवरील चार सम्प म्हणजेच जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. काही जलकुंभांची कामे जीव्हीपीआर कंपनीने सुरू केली आहेत. हर्सूल गाव येथील दोन जलकुंभ आणि सिल्क मिल कॉलनी येथे एक जलकुंभ पाडून त्याच ठिकाणी नवीन जलकुंभ बांधले जातील. कारण या ठिकाणी नवीन जागा उपलब्ध नाही. हर्सूल गावात १९९३ मध्ये बांधलेले अडीच लक्ष लिटर आणि तीन लक्ष लिटर क्षमतेचे दोन उंचावरील जलकुंभ आहेत. गेल्या सात वर्षांपासून हे जलकुंभ वापरात नाहीत. नवीन पाणीपुरवठा योजनेत हर्सूल गावासाठी १८.२० लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्याचे प्रस्तावित आहे.

पंधरा वर्षांपासून जलकुंभ वापराविना : सिल्क मिल कॉलनीत १९८७ मध्ये १.५० लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधला हाेता. गेल्या पंधरा वर्षांपासून हा जलकुंभ वापरात नाही. नवीन पाणीपुरवठा योजनेमध्ये १२.९० लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्याचे प्रस्तावित आहे. येथेही जागा नसल्याने मनपाने सध्याचा जलकुंभ पाडण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...